धोकादायक बांधकाम पडल्यास याला जबाबदार कोण?
कोंढवा पोलिस गुन्हा का दाखल करत नाही?
पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी.
कोंढवा मध्ये बेकायदेशीर बांधकाम करून झटपट पैसा कमविण्याची क्रेझ सध्या चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे महानगर पालिकेने कारवाई करून पाठ फिरवल्यास, पुन्हा कामे जोमाने करून नागरिकांचा जीव धोक्यात घातले जात आहे.
कोंढव्यातील मिठानगर, राजीव गांधीं स्कूल शेजारी, भर रस्त्यावर बेकायदेशीर बांधकाम चालू आहे. या बेकायदेशीर बांधकामावर पुणे महानगर पालिकेने २९ ऑगस्ट २०२४ रोजी कारवाई करत,
मोठ्या प्रमाणावर स्लॅबला होल पाडण्यात आले होते. जेणेकरून, पुन्हा बांधकाम होताना कामा नये. परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यानंतर पुन्हा बेकायदेशीर बांधकाम चालू झाले आहे. म्हणजे आता या बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना कायद्याची भिती राहिलेली नाही. विषेश म्हणजे कारवाई नंतर जे स्लॅब भरण्यात आले आहे. ते अतिशय धोकादायक आहे.
एखादा सौम्य भूंकपाचा धक्का जरी लागला तर ते भरलेले स्लॅब झटक्यात खाली पडून जाईल. त्यामुळे त्यांतून जीवित हानी नक्कीच होईल यात शंकाच नाही.
तर अश्या बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त केले गेले पाहिजेत. पुणे महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले आम्ही कारवाई करून पलटल्यावर पुन्हा असे प्रकार होतात. त्यासाठी त्या बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यावर लवकरच कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल. क्रमशः ( पुढील बातमी रॉयल्टी न भरता खाल्ली मलाई )