पुणे पोलिस दलात चाललंय तरी काय? महिला पोलिसाचा बलात्कार, करणाऱ्या मार्केटयार्ड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे पोलिस दलात चाललंय तरी काय? महिला पोलिसाचा बलात्कार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढवून जेवणास घरी येत असताना गुंगीचे औषध देऊन पोलीस शिपायाने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.


याप्रकरणी खडक पोलिसांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या दीपक सिताराम मोघे या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दखल केला आहे. याबाबत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद गुन्हा रजि. नं. २९४/२३ दिली आहे. हा प्रकार पोलीस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर २०२० ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही पुणे शहर पोलीस दलात नेमणुकीला असून पोलीस वसाहतीत रहायला आहे. मधील कालावधीत आरोपी दीपक मोघे फिर्यादीशी ओळख वाढविली. या काळात त्यांच्या घरी जेवणास तो येत होता. त्या दरम्यान त्याने कोल्ड्रींकमधून फिर्यादीला गुंगीकारक औषध दिले. त्यामुळे फिर्यादीस उलट्या व त्रास होत असल्याने फिर्यादीला त्याने गोळ्या खाण्यास दिल्या. त्यामुळे आणखी गुंगी “न फिर्यादी यांना झोप लागली. तेव्हा त्याने फिर्यादीसोबत शारीरीक संबंध करत त्याची चित्रफित तयार केली. हा प्रकार समजल्यावर त्यांनी जाब विचारताच त्याने हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

तसेच फिर्यादीचे पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.फिर्यादीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.फिर्यादीच्या घरातील कपाटातील ५ तोले वजनाचे सोन्याचे दागिने,लॅपटॉप, डोंगल व मोबाईल अशा सर्व बरदस्तीने घेऊन गेला.त्याच्या या त्रासाला कंटाळून शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून सहायक पोलीस निरीक्षक तोटेवार तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here