पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
विना परवानगी सभा घेतल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे सहीत इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संभाजी भिडे,राजेंद्र बाळासाहेब नेवाळे,राजेंद्र आव्हाळे,राहुल उंद्रे यांच्यासह १५० जणांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस कर्मचारी रितेश नाळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संभाजी भिडे यांची शनिवारी, नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावातील मारुती लॉन्स येथे सभा आयोजित केली होती. संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्य करुन समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याने त्यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी देऊ नये,अशी मागणी विविध संघटना, राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती.
तसेच संभाजी भिडे यांची सभा झाली तर ती उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. यासंदर्भात लोणीकंद पोलिसांना निवेदन देण्यात आले होते.मांजरी कोलवडी गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
पोलिसांनी संभजी भिडे यांच्या सभेला परवानगी नाकारली होती. मात्र, परवानगी नसताना संभाजी भिडे यांची सभा झाली.त्यामुळे पोलिसांनी रविवारी संयोजक संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत