कोंढवा बुद्रूक इनाम नगर मध्ये बेकायदेशीर बांधकामाला आशिर्वाद कोणाचा?

0
Spread the love

पालिकेच्या दुर्लक्षाने ६ मजल्यांचे बांधकाम.

पालिका सदरील बेकायदेशीर इमारत जमीनदोस्त करणार का?

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

कोंढवा बुद्रूक सर्वे नं १५ इनाम नगर मध्ये बेकायदेशीर बांधकाम बघता बघता ६ मजल्यांचे झाले परंतु पालिकेला कारवाईचा विसर पडला असल्याचे जाणवते? इनाम नगर मध्ये नोमान खान याने बेकायदेशीरपणे बांधकाम चालू केल्याने स्थानिक नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या, त्यानुसार पालिकेने नोटीस बजावली परंतु सदरील नोटीस ही फक्त आणि फक्त शासकीय प्रक्रिया पार पाडण्यासाठी देण्यात आली.

बांधकाम सुरू असताना पालिकेने पुर्ण इमारत जमीनदोस्त करणे पालिकेवर बंधनकारक असताना पालिकेने दुर्लक्ष केल्याने सदरील बेकायदेशीर बांधकाम आज ६ मजल्यापर्यंत पोहोचले आहे.आतातरी पालिका कारवाई करणार का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी विचारला आहे.

दोन गुंठ्यात बेकायदेशीर बांधकाम आणि कागदपत्रे कशी बनवली गेली? ” 

नोमान खान याने सदरील जागा २ गुंठ्याची खरेदी केली आहे आणि त्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केले परंतु सदरील जागा खरेदी विक्री झालीच कशी याची चौकशीसाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी दखल घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here