हडपसर सय्यदनगर मधील सराईत गुन्हेगार फैजान शेख ऊर्फ पच्चीसवर एमपीडीए दाखल.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

हडपसर सय्यदनगर मधील गुन्हेगार फैजान शेख उर्फ पच्चीस वर MPDA दाखल करण्यात आली आहे.यातील फिर्यादी हे दि.२६ जानेवारी २०२५ रोजी रात्री १ वाजता सुमारास दुचाकी गाडीने जात असताना सदर ठिकाणी रस्त्याच्या बाजुला उभे असलेल्या तीन इसमांना जवळ जेवणा बाबत चौकशी करत असताना एका इसमाने फिर्यादीस जोरात त्याच्या हातामध्ये घातलेल्या कडयाने कानावर मारले व त्यामुळे कान सुन्न झाला. तसेच पच्चीस याने मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर मारहाण करत शिवीगाळ केली व त्याच्याकडील धारदार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या ताब्यातील दुचाकी गाडी बळजबरीने हिसकावून पळवून नेली.

तक्रार दिल्याने त्याचे विरुध्द काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ६/२०२५ भा.न्या.सं. कलम-३०९ (६), ३५२, ३५१ (२), फौजदारी कायदा सुधारणा कलम ३,७ शस्त्र अधिनियम कलम ४ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याप्रमाणे काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार फैजान रमजान ऊर्फ कादर शेख ऊर्फ पच्चीस वय २२ वर्षे, रा. गल्ली नंबर १२/ए, सय्यदनगर महंमदवाडी पुणे याचा शोध घेवुन त्यास सदर गुन्हयात अटक करुन गाडी व मोबाईल जप्त करण्यात आला.

तसेच त्याचेवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, जबरीचोरी, मारामारी, दहशद निर्माण करणे असे अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असुन, सदर आरोपीवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.

तरी देखील सराईत आरोपी फैजान रमजान ऊर्फ कादर शेख ऊर्फ पच्चीस हा वांरवार गुन्हे करुन, समाजासाठी धोकादायक व्यक्ती असल्याने, सदर सराईत गुन्हेगार यांच्या विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन, त्यावर एमपीडीए कायदयान्वये कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालयात सादर केला असता पोलीस आयुक्त यांनी सराईत आरोपी फैजान रमजान ऊर्फ कादर शेख ऊर्फ पच्चीस हा व्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणा या कृत्यांपासून परावृत करण्याचे दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रर्व्यावषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलावृतीची विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती, वाळुची तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी एमपीडीए दाखल करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही अमितेश कुमार, रंजन कुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचने प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, काळभोर,कांबळे, लाहिगुडे, पोलीस अंमलदार सुर्यवंशी, पोलीस अंमलदार तांबोळी, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here