कोंढव्यातील अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगर पालिकेची कारवाई,

0
Spread the love

अनधिकृत बांधकामे करणाऱ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान.

पुणे सिटी टाईम्स24‌ ; प्रतिनिधी.पुणे शहरातील उपनगर परिसरातील कोंढवा भागात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे.

पुणे महानगर पालिका नोटीसा बजावून कारवाई देखील करते परंतु पालिकेचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करून माघारी फिरले कि पुन्हा अवैध बांधकाम सुरू होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.

अनधिकृत बांधकामावर पुणे महानगर पालिकेने दोन इमारतींवर कारवाई केल्याने कोंढव्यात अनधिकृत बांधकामे करणाऱ्या व्यावसायिकांमधील चांगलेच वातावरण तापले आहे.

कोंढवा खुर्द येथील सर्वे नंबर ४४/१ संत ज्ञानेश्वर नगर लेन नं ४ अ मधील जफर बगदादी यांचे ४ स्लॅबला होल मारून ३६०० स्क्वेअर फुटावर कारवाई करण्यात आली आहे तर सर्वे नंबर ५० भाग्योदय नगर फाईसटार बेकरी समोर लेन नं २० मधील मजहर मणियार यांच्या १२ × १२ मापाचे ४ स्लॅबला होल मारण्यात आले तर १०×१० मापाचे ४० भिंती पाडण्यात आले असून ६७५० स्क्वेअर फुटावर मनपाने कारवाई केली आहे.

अनधिकृत बांधकामावर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे पुणे सिटी टाईम्स24 ला मनपाकडून कळविण्यात आले आहे.

अनधिकृत बांधकामांना पुणे महानगर पालिकेने आताच अटकाव केला नाहीतर येणाऱ्या काळात भयंकर नुकसान होईल हे टाळता येणार नाही,

आज भाग्योदय नगर,मिठानगर, साईबाबा नगर, कम्युनिटी सोसायटी शेजारी असे अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांचे इमले उभे राहिले आहे व आज रोजी उभे राहत ही आहे. कोणाच्या हित संबधाने हे सर्व अनधिकृत बांधकामे सुरू यावर लवकरच पुणे सिटी टाईम्स24 प्रकाश टाकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here