रेशनिंग माफीयांमध्ये उडाली खळबळ.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी पुणे, नागरिकांच्या हक्काचे घास चोरून अवैध मार्गाने दुसऱ्या ठिकाणी पोहोचविणा-यांचे मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तर ९७ लाख ४४ हजारांचा माल जप्त करण्यात आल्याने रेशनिंग खात्यातील अधिकाऱ्यांचे भुया उंचावले आहे.
स्वारगेट हद्दीत पेट्रोलिंग फिरत असताना पोलिस अंमलदार गजानन सोनूने व कादीर शेख यांना बातमी मिळाली की १५ नंबर हडपसर येते १) MH 18 BA 7725 , २)MH 18 BG 0053 , ३ )MH 18 BG 5859 अशा तीन ट्रक मध्ये रेशनिंगचा असलेला अन्नधान्य माल छुप्या पद्धतीने खुल्या बाजारात बेकायदेशीर रित्या विक्री करिता घेऊन खोपोली जि.रायगड येते जात आहेत.
११ फेब्रुवारी रोजी १५ नंबर हडपसर पुणे या ठिकाणी श्री कानकलक्ष्मी अग्रो ट्रेडर्स गुंज गांगवती जी कोपल राज्य कर्नाटक,जय आनंद फूड इंडस्ट्रीज खोपोली जीं रायगड, मुबारक ट्रान्सपोर्ट चे मालक यांनी संगनमत करून तांदूळ हे शासकीय धान्य अवैधरित्या घेऊन बेकायदेशीरपणे पांढ-या , पिवळ्या व लाल अशा वेगवेगळ्या रंगाचे पोलित्थिन पोत्यात भरून जीएसटी नंबरच्या बनावट पावत्या तयार करून ती पोती तीन ट्रक मध्ये भरून चालेली होती.
त्या ट्रक मध्ये एकून ८०० क्विटल तांदूळ असा ऐकून ९७ लाख ४४ हजार रूपयांचा मालाचा काळाबाजार करून तो विक्री करण्यासाठी पाठून शासनाची फसवणूक केली आहे.
सदरील प्रकरणा बाबतीत हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४२०,४०९,३४ व जिवना अत्यावशक वस्तू अधिनियम १९४४ चे कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास गुन्हे शाखा युनिट २ करीत आहेत. याबाबत अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सदरील धान्य हे आमचा शासकीय धान्य नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, सहाय्यक फौजदार आंब्रे, पोलीस अंमलदार किशोर वग्गू, संजय जाधव ,मोहसीन शेख,
साधना ताम्हाणे, उत्तम तारू ,चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने, समीर पटेल, कादिर शेख, निखिल जाधव, मितेश चोरमोले, नागनाथ राख यांनी केलेली आहे.