पुण्यातील भाजपा कार्यकर्त्याच्या पब मध्ये चालतोय हुक्का व डिस्को, नियमांची ऐशीतैशी.

0
Spread the love

त्या वसुली वाल्याच्या आशिर्वादाने रात्री उशिरापर्यंत हुक्का,पब चालू?

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, विमानगर मध्ये रात्री उशिरापर्यंत चालणा-या हुक्का,पब मुळे स्थानिक नागरिक त्रासलेले असून याला कोणीतरी आवरा हो? अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

विमानगर मध्ये राजरोसपणे द माफिया स्काय लॉंज मध्ये हुक्का व डिस्को डान्स चालू असतानाही सदरील “द माफिया” कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे? हे काय सांगण्याची गरज नाही. ५ पेक्षा जास्त एकाच ठिकाणी नागरिकांनी थांबू नये असे नियम असताना सदरील नियम धाब्यावर बसविले आहेत.

१३,१४ फेब्रुवारी रोजी असलेले इव्हेंट

सर्व सामान्यांना १४४ कलमांचे डोस पाजणाऱ्या पोलीसांना हे जमाव दिसत नाही का? कोरोनाचे नियम अजूनही स्थिल झालेले नसताना “द माफिया” मध्ये शेकडो तरूण तरूणी डान्स करत असल्याचा व्हिडिओ पुणे सिटी टाईम्सच्या हाती आले आहे.

सदरील हॉटेल बाबतीत माहिती घेतली असता पुण्यातील एका भाजपच्या कार्यकर्त्याचे हॉटेल असल्याचे जाणकारांनी सांगितले, एका पक्षाचा कार्यकर्ता असल्यानेच सदरील पबवर कारवाई केली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे सांगणे आहे.

दर शनिवारी-रविवारी विना परवाना मोठ मोठे इव्हेंट होत असताना देखील पोलीसांचे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. काल शनिवारी देखील इव्हेंट झाला व आज रविवारी देखील इव्हेंट आहे.

तर सदरील हॉटेलला वसुली वाल्याची मेहरबानी असल्याचे बोलले जात आहे? अश्या लेट-नाईट चालणाऱ्या द माफिया वर पोलीस आयुक्त कारवाई करणार का? का भाजपाचा कार्यकर्त्यावर मेहरबानी करून सोडून देणार? असा प्रश्न देखील नागरिकांनी विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here