पुणे सिटी टाईम्स (PCT) प्रतिनिधी.
४ लाख ६१ हजरांचा गांजा विमाननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जप्त करण्यात आला आहे. आज दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच अधिनस्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना
मिळालेले बातमीनुसार पोरवाल रोड निंबाळकरनगर, लेन नंबर २,पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम वैभव लक्ष्मण राठोड, वय १९ वर्षे, रा. ढवळकेवाडी, पोस्ट मालेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी याच्या ताब्यातुन एकुण ४ लाख ६१ हजारांचा २२ किलो गांजा हा अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन येथे एन.डी. पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २,राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील
पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी,योगेश मांढरे, संदिप जाधव, दिशा खेवलकर, साहिल शेख, संदिप शेळके,अझिम शेख, नितीन जगदाळे, यांनी केली आहे.