पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
स्वारगेट पोलीस ठाण्यात तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप मगनशेठ फुलपगारे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अभय सोनवणे, राहुल खुडे, हेमंत गायकवाड, मंगेश पवार, अक्षय डावरे, बापु खुडे, उज्वला गौड, गणेश शेरला यांच्यासह १०० ते १२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार स्वारगेट पोलीस ठाण्यात व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात २० सप्टेबर रोजी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, काही जणांनी गणेश विसर्जन मिरवणुक मशीदीवरुन नेण्यास मनाई केली. तसेच स्पिकर बंद करायला भाग पाडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन कार्यकर्ते स्वारगेट पोलीस ठाण्यात जमा झाले होते.
दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकारी यांना शासकीय कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्याविरुद्ध धाकदपटशाहीचा वापर करुन जमावाला भडकावून त्यांच्या येण्या जाणयचा मार्ग अडविला.
खासगी मालकीच्या चारचाकी गाड्या पोलीस ठाण्याच्या आवारात लावून पोलीस वाहनांची कोंडी केली. तसेच जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे आहे तपास करीत आहेत.