पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
४ जानेवारी २०२३ रोजी युनिट-५, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील स्टाफ हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग फिरत असताना पोलीस अमंलदार विनोद शिवले व पोलीस अंमलदार अकबर शेख यांना बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार फैज अन्सारी याने बजाज पल्सर मोटार सायकल चोरलेली असुन तो ससाणेनगर रोडवर फिरत आहे.
अशी बातमी मिळाल्याने ससाणेनगर भागात सापळा रचुन बजाज पल्सर मोटार सायकलवर फिरणारे १) फैज उर्फ बेंटम आरिफ अन्सारी वय-१९ वर्ष, रा. गल्ली नं २०, सय्यदनगर, हडपसर, पुणे २) अतिफ उर्फ आत्तु जहीर अन्सारी वय-२१ वर्ष, रा सनं १५, ए, सय्यदनगर, हडपसर, पुणे ३) एक विधीसंघर्षित बालक यांना पुरोहित स्विटमार्ट चौक, हडपसर पुणे येथे ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक बजाज कंपनीची मोटार सायकल जप्त करुन आरोपींना अटक केली आहे.
आरोपींकडे तपास केला असता फैज उर्फ बेंटम आरिफ अन्सारी व अतिफ उर्फ आत्तु जहीर अन्सारी त्यांनी यापुर्वी चोरल्याल्या २ होन्डा अॅक्टीवा मोपेड,२ हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल काढुन दिल्या. त्या जप्त करणेत आलेल्या आहेत.आरोपीकडुन १ बजाज पल्सर,२ अॅक्टिव्हा मोपेड व २ हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल असे एकुण १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे ५ मोटार सायकली जप्त करणेत आलेल्या आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त, अमोल झेंडे,सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम,सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर,पोलीस अमंलदार विनोद शिवले, अकबर शेख, रमेश साबळे, अमित कांबळे,दिपक लांडगे,दया शेगर,चेतन चव्हाण,दाऊद सय्यद,शशीकांत नाळे यांनी केलेली आहे.