पुण्यातील रेशनिंगचे धान्य थेट यवत मध्ये विकणारी टोळीचा पर्दाफाश ; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त.भवानी पेठेतील गुंडांचा सहभाग

0
Spread the love

मटक्याचे धंदेवाले झाले रेशनिंग धान्य खरेदीदार.

जावेद लालू शेख याच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात जीवना आवश्यक कादया अंतर्गत यापूर्वीही दाखल आहे गुन्हा.

अन्न धान्य वितरण कार्यालयाची यंत्रणा ठरली कुचकामी?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) अजहर खान

पुणे शहरातील काही भागातील रेशनिंगचे धान्य भवानी पेठेतील काशेवाडीत काळया बाजारात खरेदी करून थेट यवत येथे विक्री होत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी ही काशेवाडीत भंगार विक्रेता झाला रेशनिंग धान्य खरेदीदार या सतरा खाली पुणे सिटी टाईम्सने बातमी प्रसिद्ध केली होती. परंतु अन्न धान्य वितरण कार्यालयातील कुचकामी ठरलेली यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने पुन्हा काळाबाजार सुरू झाला आहे.

पुण्यातील रेशनिंग धान्य यवत मध्ये विक्री करणारी टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. सोलापूर महामार्गावरील यवत ग्रामपंचायत हद्दीत रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे.त्यांच्याकडून पोलिसांनी ३ मालवाहतूक टेम्पो व धान्य असा १२ लाख ७३ हजार २५० रुपयांचा मुदेमाल जप्त केला आहे.

१) मुकेश नरसिंगराव माधव (वय – २१ रा. बिबेवाडी वोटा नं १०९, सुहाग मंगल कार्यालय ता. हवेली, २) भाऊसाहेब अर्जुन कुटे वय ३७, रा. नाईस प्लॉट, कॅनॉल जवळ चारभुजा सायकल मार्टचे पाठीमागे, गुलटेकडी,३) सादिक इलाहीबक्ष अलबेलकर वय ५५, रा.काशेवाडी, भवानी पेठ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर रेशन धान्याची अफरातफर करत वाहतूक व विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस हवालदार सचिन घाडगे यांना एका खबऱ्याकडून मिळाली होती. मिळालेल्या माहिती वरिष्ठांना सांगितली.त्यानुसार वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार दौंडचे पुरवठा अधिकारी व यवत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना कळविण्यात आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कासुर्डी टोलनाका येथे सापळा रचण्यात आला.यावेळी मिळालेल्या माहिती नुसार पुण्याच्या दिशेतून जाणारे तीन मालवाहतूक टेम्पो पकडण्यात आले. गाड्यांच्या चालकांना गाडीत असलेल्या मालासंबंधी विचारणा केली असता त्यांनी गाडीत गहू, तांदूळ, हरभरा असल्याचे सांगितले.

यावेळी अधिक चौकशी केली असता चालकांकडे मालाशी संबंधित कोणतीच कागपत्रे नव्हती.पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी जावेद लालू शेख,कासिम शेखअमोल कंधारे,अब्बास अब्दुल सरकारवर रा . तिघेही काशेवाडी भवानी पेठ यांचा माल असल्याची कबुली दिली.सदरचा माल वाहनचालक केडगाव येथील दुकानदार यांच्याकडे घेऊन जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले. धान्याची पडताळणी केली असता ते रेशनिंगचेच असल्याची खात्री करण्यात आली .

दरम्यान , पंचांना बोलावून पंचनामा करण्यात आला .या तीनही वाहनांत मिळून १० हजार ८०० किलो रेशनिंगचे तांदूळ , ३०० किलो गहू , २५ किलो हरबरा असे रेशनिंगचे धान्य मिळून आले . त्यांच्याकडून पोलिसांनी तीन मालवाहतूक टेम्पो व धान्य असा १२ लाख ७३ हजार २५० रुपयांचा मुदेमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई ही पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे , पोलिस हवालदार सचिन घाडगे , असिफ शेख , अजित भुजबळ , विजय कांचन , अजय घुले , धिरज जाधव यांच्या पथकाने केली आहे .

जावेद लालू शेख याच्यावर मध्यंतरी रेशनिंग धान्य काळाबाजार प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या नंतर ही पुन्हा रेशनिंगचा धंदा जोरात सुरू होता. परंतु त्या बद्दल अनेक तक्रारी त्या तक्रारीकडे पुरवठा विभागाने दुर्लक्ष केले आहे. सदरील टोळीवर मोक्का दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here