पुणे : कोंढव्यात माजी नगरसेविका हमीदा सुंडके यांचे नाव चर्चेत, सूत्रे हलवण्यास सुरुवात.

0
Spread the love

कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार?

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी,

कोंढव्यातील महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण कोंढवा हा मुस्लिम बहुल भाग असल्याने येथे सर्वांचे लक्ष वेधले जाते आहे. मागच्या निवडणुकीत, म्हणजे २०१७ च्या निवडणुकीत अजित पवार यांच्या आशीर्वादाने हाजी फिरोज यांच्या पत्नी परवीन शेख, हाजी गफूर पठाण, अनिस सुंडके यांचे सख्खे भाऊ रईस सुंडके तसेच अनिस सुंडके यांच्या पत्नी हमीदा सुंडके अशा चौघांचा पॅनल लढला होता. त्यात परवीन शेख, हाजी गफूर पठाण आणि हमीदा सुंडके या तिघी निवडणुकीत विजयी झाल्या होत्या.

गेल्या लोकसभा निवडणुकीत अनिस सुंडके यांनी एमआयएम पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. आता माजी नगरसेविका हमीदा सुंडके यांना पुन्हा अनिस सुंडके यांनी रिंगणात उतरवले आहे. यामुळे जोरदार लढत होणार आहे. अनिस सुंडके यांची कोंढवा भागात चांगली पकड आहे. त्याचा फायदा घेऊन सुंडके यांनी हुकूमचा एक्का बाहेर काढला आहे. कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत अनिस सुंडके यांनी बोलणे टाळले असले, तरी निवडणुकीत आता कोणासमोर पत्नीला उभे करणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

महानगरपालिका निवडणुकीची घोषणा नुकतीच (१५ डिसेंबर २०२५) झाली आहे. नामनिर्देशन पत्रे २३ ते ३० डिसेंबरपर्यंत स्वीकारली जाणार आहेत, मतदान १५ जानेवारी २०२६ ला आणि निकाल १६ जानेवारीला आहे.हमीदा सुंडके यांच्या पक्षाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.अनिस सुंडके यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत AIMIM (एमआयएम) कडून लढवले होते, पण महापालिका निवडणुकीसाठी कोणत्या पक्षातून (किंवा अपक्ष) उमेदवारी दाखल करणार, याबाबत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच हे निश्चित होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here