आम्ही काही चुकीचं केलं नाही व आम्हाला नोटीस व सील करण्यात येणार असल्याची माहिती नसल्याचे सांगणारे पालिकेकडे झाले सरेंडर.
ताबा तर दिला परंतु १ वर्षाचे १२ लाख ६० हजार रुपये भाडे थकीत.
पुणे सिटी टाइम्स प्रतिनिधी
कोंढवा खुर्द मधील अबु हनीफा बहुद्देशीय संस्कृती हॉल हे फ्युचर फाउंडेशनला करारनाम्यावर ५ वर्षासाठी चालवण्यासाठी महानगर पालिकेने दिले होते. फ्युचर फाउंडेशनने ताबा घेतल्यापासून वादात सापडले होते. त्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. आरोप काही संपेना, तर पालिकेने वारंवार पत्रव्यवहार करून खुलासा मागितला होता. परंतु खुलासा हा फक्त फाईल बंद मध्ये राहून जायचा. यात अनेकांनी पाठपुरावा करून अखेर ते मार्गी लावलेच आहे. फाउंडेशनवर अनेक गंभीर आरोप लावले जात होते.
पालिकेने केलेल्या करारानुसार सदरील संस्थेला अबु हनीफा बहुद्देशीय संस्कृती हॉल हा लग्न समारंभासाठी भाड्याने देऊ नये अशी अट घातली होती. परंतु संस्थेने ती अट धुडकावून लावत सकाळी-संध्याकाळी भाड्याने २५ हजार रुपये प्रमाणे देणे सुरू केल्याची तक्रार पालिकेकडे येऊ लागल्या होत्या.
त्यावर पालिकेने पत्र देऊन हॉल ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्या बाबतीत पुणे सिटी टाइम्सने बातमी प्रसिद्ध केली होती. त्याला खुलासा करत संस्थेच्या अध्यक्षाने एक व्हिडिओ प्रसारित करून सदरील बातमी खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे सांगितले होते. अखेर स्वतःहून हॉलचा ताबा पुणे महानगर पालिकेकडे जमा केल्याने आता संस्थेच्या अध्यक्षा खोट्या ठरल्या आहेत.




