पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
हडपसर भागातील सय्यदनगर येथे दहशत माजविणारा कुख्यात गुंड टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांवर जमीन बळकावून बेकायदा ताबा घेतला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताबा सोडण्यासाठी महिलेकडे तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ३१ वर्षाच्या महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही महिला मुळची मुंबईतील कुर्ला परिसरातील रहिवासी आहे. तिच्या फिर्यादीनुसार, १) टिपू ऊर्फ रिझवान सत्तार पठाण, २) सादिक कपूर, ३) एजाज पठाण, ४)मेहबूब अब्दुल गफार शेख, ५) जावेद गणी शेख, ६) साजीद जिब्राईल नदाफ, ७) इराफान नासीर शेख, ८) अजीम उर्फ अंट्या महंमद हुसेन शेख, ९) मतीन हकीम सय्यद, १०) तन्वीर शकील शेख, ११) इम्तियाज ख्वाजा पठाण (सर्व रा. सय्यदनगर, हडपसर), १२) अजिंक्य बाळासाहेब उंद्रे (रा. मांजरी खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिपू पठाण व त्याच्या साथीदारावर पोलिसांनी मोक्का कारवाई केली असून पठाणसह त्याच्या साथीदारांची बँक खाती गोठविण्यात आली आहे. काळेपडळ पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पठाणसह साथीदारांची घराची झडती घेतली.
तेथून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, महागडी मोटार, तीन दुचाकी, तसेच गृहोपयोगी वस्तू असा माल जप्त करण्यात आला आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी टिपू पठाणच्या आईने आरोप फेटाळून लावले होते.




