गुन्हा दाखल न करण्यासाठी भाजपाची फौज पोलिस ठाण्यात तर महिला पोलिस अधिकाऱ्यावर दबाव?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे महानगर पालिकेच्या महिला अधिकाऱ्याला त्रास दिल्याबद्दल भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने पुणे शहरात चर्चेला उधाण आले होते. ती चर्चा संपण्यापूर्वीच पुन्हा एका चर्चेला उत आले असून भाजपाच्या एका आमदाराच्या खंदे समर्थकाने थेट महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासणे यांचा खंदे समर्थक असलेला प्रमोद कोंढरे याने विश्रामबाग पोलिस ठाण्यातील वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याने त्याच्या विरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर कोंढरे विरोधात गुन्हा न करण्यासाठी महिला अधिकाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.