” नोमान ” च्या बेकायदेशीर बांधकामाला आश्रय अधिकाऱ्यांचा.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंढवा बुद्रूक सर्वे नं १५/१६ मध्ये नोमान नावाचा बिल्डर १ गुंठ्यात भली मोठी इमारत बांधत असताना त्या बेकायदेशीर बांधकामाला पालिकेतील अधिकारीच आश्रय देतात का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला आहे. नोमान याने १ गुंठ्यात तब्बल ७ मजली इमारत बांधून मोठा पराक्रम केला आहे.
कधी ह्या इमारतीला भूकंपाचा सौम्य झटका लागला की जमीनदोस्त होईल? परंतु पालिकेच्या इमानदार अधिकाऱ्यांना याचे काहीही देणेघेणे नाही. कारण ते मस्तवाल पणे कुंभकर्णाची झोप घेत आहेत.
यापूर्वी नोमान याच्या बेकायदेशीर बांधकामावर पालिकेने ” होल मारो ” कारवाई केलेली होती. परंतु कारवाई करूनही इमारत ७ मजली उभी राहिली. कारण डॉक्टर डॅन चा काळा चष्मा अधिकारी लावून बसले आहेत. सदरील बेकायदेशीर कामावर कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर होल मारलेले स्लॅब पुन्हा भरण्यात आले याचा अर्थ नागरिकांना घरे विकून त्यांचा जीव धोक्यात घालण्याचा काम नोमान करत आहे.
अश्या बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे मुसक्या पोलिसांनी आवळल्या पाहिजे. तर पुणे सिटी टाईम्सने गुन्हा दाखल करण्याची मागणी वरिष्ठांना केली असून जमीन मालक व नोमान या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.तर नागरिकांनी कोंढव्यात घर घेताना काळजी बाळगावी असे आव्हान करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कनिष्ठ अभियंता उदय पाटील यांची भेट घेऊन माहिती घेतली असता ते म्हणाले MRTP ACT प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.