तर रॉयल्टी वसुली करण्याची तर वीज मीटर पुरवठा न करण्याची तक्रार दाखल.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
बेकायदेशीर बांधकाम करून पुणे महानगर पालिकेची फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. सर्वे नं ५६ हिस्सा नंबर २/४/२ मध्ये अशोक एकनाथ वाघमारे, दिपक एकनाथ वाघमारे, नवनाथ एकनाथ वाघमारे कुटुंबीयांची जागेत चेतन लोणकर हा इतर भागिदारांना घेऊन बेकायदेशीर बांधकाम करत आहे.
सदरील बेकायदेशीर बांधकामाला पालिकेने नोटीस बजावली असतानाही चेतन याने बेकायदेशीर बांधकाम चालूच ठेवले आहे. सदरील बांधकाम करताना चेतन याने गौण खनिज उत्खनन केले त्याची माहिती पुणे सिटी टाईम्सने तहसीलदार ( हवेली) यांचेकडे माहिती घेतली असता अशी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे सांगितले आहे.
तर लगेचच तलाठी,मंडल अधिकारी यांना पंचनामा करण्याचे सांगितले. तर सदरील बेकायदेशीर बांधकामाला अजिबात वीज मीटर देण्यात येऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुख्याधिकारी ( रास्ता पेठ) यांच्याकडे मागणी केली आहे.
आता या बेकायदेशीर बांधकामाला कसे विज मीटर दिले जातात याकडे लक्ष टिकून राहणार आहे. तर पालिकेने तात्काळ बांधकाम पाळावे आणि जागा मालकांसहीत बांधकाम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
क्रमशः ( पुढील ; चेतन व भागीदारांचे बेकायदेशीर बांधकाम आणि सब रजिस्टर, एमएसीबी, नागरिकांची फसवणूक कशी केली..?)
“ नवचर्चित मनपा आयुक्त नवल किशोर राम हे बेकायदेशीर बांधकामाला लगाम घालणार का? “
नवल किशोर राम हे पुणे जिल्हाधिकारी असताना त्यांचा चांगलाच दरारा होता. त्यांनी अनेक झटपट निर्णय घेतले आहे. आता कोंढव्यात सुरू असलेल्या चेतन लोणकरच्या बांधकामाला जॉकटर लावणार का? यासाठी त्यांना भेटून कारवाईची मागणी केली जाणार आहे.