समाजिक कार्यकर्ते अजहर खान यांनी प्रथम केली होती तक्रार.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुण्यातील कात्रज येथील दत्त नगर मध्ये एका सलून च्या दुकाना समोर दुचाकीवर भारताचे वीर स्वतंत्र सेनानी टिपू सुलतान यांचे दुचाकीवर फोटो-स्टिकर लावलेले होते. ते फोटो-स्टिकर काढण्यास लावून ऋषिकेश नारायण भणगे याने घोषणा बाजी करून, सदरील व्हिडिओ फेसबुक या सोशल मीडियावर टाकले होते. त्या संदर्भात पुण्यातील समाजिक कार्यकर्ते अजहर खान यांच्या निर्दशनास आले होते.
त्या संदर्भात खान यांनी पोलिस आयुक्त व मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करत अशा बिनबुडाचे पोस्ट मुळे, दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने व टिपू सुलतान हे भारताचे वीर स्वतंत्र सेनानी असल्याने त्यांचे भारतीय संविधानामध्ये देखील उल्लेख असल्याने, चुकीचा इतीहास दाखवून एका समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध भडकवण्याचे काम केल्याप्रकरणी ऋषिकेश नारायण भणगे याच्या विरोधात लेखी तक्रार केली होती.
तीच तक्रार पुणे शहरातील व महाराष्ट्रातील इतर समाजिक संघटनांनी देखील केली होती.व आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. त्याची दखल घेत भारती विद्यापीठ पोलिसांनी ऋषिकेश नारायण भणगे याच्या विरोधात १५३अ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या समज पत्रातून समोर आले आहे.