डॉ. पी. ए. ईनामदार यांना समाजभूषण पुरस्कार व पुणे सिटी टाईम्सचे मुख्य संपादकांना दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

0
Spread the love

प्रेस लाईव्ह मिडियाकडून कार्यक्रमाचे आयोजन.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

डॉ.पी.ए.ईनामदार विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना रविवारी माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रेस मीडिया लाईव्ह’ या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. २० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वाजता प्रेस मीडिया लाईव्हद्वारे आझम कॅम्पस येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.प्रेस मीडिया लाईव्ह या वृत्तसंस्थेचे प्रमुख मेहबूब सर्जेखान यांनी यावेळी बोलताना डॉ. कुमार सप्तर्षी यांचे स्वागत केले आणि ते म्हणाले, भारत हे सर्वसमावेशक राष्ट्र आहे.

त्याचे स्वरूप बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. भारताची अखंडता आणि सौहार्द संपवण्याचे षडयंत्र यशस्वी होऊ दिले जाणार नाही. ही निवडणूक लोकशाहीसाठी शेवटची निवडणूक असू शकते, त्यामुळे फॅसिस्ट सरकार पुन्हा येऊ देऊ नये.

तर पुणे सिटी टाईम्सचे मुख्य संपादक अजहर खान हे रोखठोक व निःपक्षपाती पणे पत्रकारिता करून लोकांना न्याय देण्यासाठी अग्रेसर असल्याने अजहर खान यांना प्रेस लाईव्ह मिडियाकडून दर्पण पुरस्कार देऊन मोहन जोशी व पी ए. ईनामदार यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमाचे आयोजन प्रेस लाईव्ह मिडियाचे प्रमुख मेहबूब सरजे खान यांनी केले होते. तर अजहर खान यांनी मेहबूब सरजे खान यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here