पुणे सिटी टाईम्सच्या कॅमेऱ्यात व्हिडिओ कैद.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलिस चिरीमिरी घेऊन वाहने सोडल्याची चर्चा आपण करतच असतो व ऐकत असतोच, परंतु आज वाहतूक पोलिस प्रत्यक्षात चिरीमिरी घेत असल्याचा व्हिडिओ पुणे सिटी टाईम्सच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हकीकत अशी की, पुणे बी. टी. कवडे रोडवर ( क्रोमा मॉल चौक) वाहतूक पोलिस वाहतूक कोंडी सोडविण्याचे सोडून वाहने अडवून चिरीमिरी घेत असल्याचे दिसून आले आहे. टेम्पो क्रमांक MH.12. RP.7822 ही टेम्पो गाडी वाहतूक पोलिसांनी अडवून कागदपत्रांची मागणी केली.
परंतु दोघांमध्ये साटेलोटे होऊन टेम्पो चालकाकडून २०० रूपयांची चिरीमिरी घेत असल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आजूबाजूला माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, हे प्रकार रोजचेच आहे.
विनाकारण वाहने थांबवून चिरीमिरी घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते? परंतु ऐकडी वाहतूक कोंडी कडे दुर्लक्ष करून स्वतःचे हित जपणाऱ्या विरोधात कारवाईची मागणी आजूबाजूच्या व्यवसायिकांनी केली आहे. यावर आता वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर काय कारवाई करणार याकडे लक्ष राहणार आहे. क्रमशः