पानटपरीत गांजाची पुडी ठेवून खंडणी मागणाऱ्या अनओळखी लोकांवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS ONLINE) प्रतिनिधी.

पानटपरीत गांजाची पुडी ठेवून खंडणी मागणाऱ्या ४ अनओळखी लोकांवर चंदननगर पोलिस ठाण्यात ४०/२०२४ भादवि कलम ३८४,३८९,३४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल दिलीप परांडकर, वय-२६ वर्षे,आनंदश्री सोसायटी, सदनिका नं.सी-४९, आनंद पार्क बसस्टॉप जवळ, वडगावशेर, यांनी फिर्याद दिली आहे.१९ जानेवारी २०२४ रोजी गणेशपार्क लेन नं.४, जुना मुंढवा रोडचे लगत, बुद्धाज कॅफे जवळ असलेली, लोखंडी पत्र्याची पानटपरी आहे.

यातील तक्रारदार व त्यांचे मित्र बसले असताना, त्यांचे समोर २ अनोळखी पुरूष व २ अनोळखी महिला येवुन त्यांनी तक्रारदार यांना ते गांजा विक्री करतात असे खोटे बोलुन, त्यांचेवर, ते गांजा विक्री करतात असे पोलीसांना सांगुन, तशी खोटी केस करावयाची नसल्यास त्याबदल्यात पैशांची मागणी केली व तक्रारदार यांनी पैसे देणेस नकार दिला असता, त्यांनी त्यांचे जवळील एका पिशवीतील कसल्यातरी पदार्थाच्या काही पुड्या तक्रारदार यांचे अंगावर टाकुन, त्यांचेकडील फोनमध्ये व्हिडीओ रेकॉर्डीग करून, त्या आधारे तक्रारदार यांचे विरूध्द पोलीसांकडे खोटी केस करण्याची परत भिती घालुन, अधिक पैशांची मागणी केली असता,

तक्रारदार यांनी वर नमुद आरोपी यांना नकार दिला असता, त्यांनी तक्रारदार यांना दमदाटी करून, हाताने मारहाण केली आहे म्हणुन तक्रारदार यांनी २ अनोळखी महिला व २ अनोळखी पुरूष इसमांचे विरूध्द कायदेशीर तक्रार दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा नोंद आहे.रामेश्वर रेवले पोलीस उपनिरीक्षक,हे पुढील तपास करीत आहेत.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here