हडपसर,लष्कर,बंडगार्डन,फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई.
पुणे,मुंबई व गुजरात कनेक्शन उध्वस्त.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
वरिष्ठांनी दिलेले आदेश व सुचनानुसार सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे-१,सुनील तांबे यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील पोलीस निरीक्षक,अश्विनी सातपुते यांना आदेश व सुचना दिले होत्या. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक -१ कडील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी जानेवारी २०२४ मध्ये पुणे शहरातील हडपसर, लष्कर, फरासखाना, बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.२ जानेवारी २०२४ रोजी हडपसर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात विठ्ठल अमृततुल्य समोरील सार्वजनिक रोडवर १) शिवम शिवप्रसाद सोनुने, वय-२१, रा. घुलेनगर, विक्रम वाईन्स शेजारी, लेन नं.७, मांजरी, पुणे हा त्याचे ताब्यात १ लाख ६ हजाराचे ५ ग्रॅम ३०० मिली ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ व १० हजारांचा एक मोबाईल हॅण्डसेट मिळुन आला आहे. त्याचे विरुध्द हडपसर पोलिस ठाणे गु.र.नं.०८/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर फरासखाना पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पुणे-९६६, रविवार पेठ येथील डुल्या मारुती चौका कडुन लक्ष्मीरोडकडे जाणारे रोडवरील हॉटेल दावत रेस्टोरंन्ट येथे रेकॉर्डवरील आरोपी २) अरबाज रफीक बागेवाडी, वय-२६, रा. दौलत क्लासिक बिल्डींग, फ्लॅट नंबर २०६, शितल पेट्रोलपंप मागे मिठानगर, कोंढवा, पुणे हा त्याचा साथीदार अफाक अन्सार खान, रा. गणेश पेठ, पुणे (पाहिजे आरोपी) याचे मदतीने १ लाख २८ हजारांचा ऐवज व अंमली पदार्थ त्यामध्ये ३ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ ६० हजार,एक मोबाईल फोन १८ हजार एक, होन्डा डी.ओ. दुचाकी गाडीवर असा अंमली पदार्थ व माल विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन असल्याने त्या दोघांचे एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करीता संगनमत असल्याचे दिसुन येत असल्याने त्यांचे विरुध्द फरासखाना पोलिस ठाण्यात गुरनं.४/२०२४ एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (अ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लष्कर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पुणे कॅम्प येथील हेवन हाऊस, सेंटर स्ट्रीट कॅम्प, इंटरनॅशनल बारबल क्लब याठिकाणी ३) मोहम्मद अलताफ पटेल, वय-२४ वर्षे, रा. एम. जी. रोड, १८५ हेवन हाऊसट पुणे हा त्याचे ताब्यात १ लाख १७ हजारांचा ऐवज त्यामध्ये १ लाख १६ हजार रुपयाचे
५ ग्रॅम ८०० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, १ हजार रुपयांचा एक मोबाईल फोन, एक व्हि.आय कंपनीचे सिमकार्ड असा अंमली पदार्थ व माल मिळुन आला आहे. म्हणुन त्याचे विरुध्द लष्कर पोलिस ठाण्यात गुरनं.०८/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ जानेवारी २०२४ रोजी बंडगार्डन पोलिस ठाण्याचे हद्दीत जहांगिर हॉस्पिटल चौकाकडुन रुबी हॉल मेट्रो स्टेशनकडे जाणारे सार्वजनिक रस्त्यावर पुणे अन्ना रस्सम हॉटेल जवळील सार्वजनिक फुटपाथ याठिकाणी आरोपी ४) विरेश नगीनभाई रुपासरी, वय-५३, रा. विरेश्वर प्रकाश, तिसरा मजला, पार्ले ईस्ट मुंबई, मुळ रा. सिलव्हासा, दादरानगर हवेली हा त्याचे ताब्यात २२ लाख ३७ हजार २०० रुपयांचा ऐवज त्यामध्ये १०७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ २१ लाख ५२हजार किंमतीचा तसेच रोख रुपये ६४ हजार,एक ईलेक्ट्रॉनिक वजन काटा दोन मोबाईल २० हजाराचे तसेच एक छोटी निळे रंगाची पाऊच, खाकी रंगाचे कागदी छोटया पुडया असा अंमली पदार्थ विक्री करता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुरनं.११/२०२४, एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा वरिष्ठांचे आदेशा नुसार अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे सहा. पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांचेकडे देण्यात आला होता. नमुद गुन्हयाचे तपासात सदर गुन्हयातील आरोपी याचा साथीदार ५) अमजद हसमत अली सय्यद ऊर्फ सनी ऊर्फ फैयज, वय ४८ वर्षे, रा. मोहम्मद मिस्त्री चाळ, गोळीबार रोड, सांताक्रुज इस्ट, मश्जिद रोड मुंबई याने दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. सदर इसम अमजद हसमत अली सैय्यद याचेबाबत पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी गोपनिय माहिती प्राप्त झाली की, सदरचा आरोपी हा मुंबई येथे राहणारा असुन, तो त्याचे नातेवाईकांकडे दुबई येथे पळुन जाण्याचे तयारीत आहे. नमुद प्रमाणे माहिती प्राप्त झालेने तो परदेशात पळुन जावु नये म्हणुन पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी तात्काळ त्याबाबत एअरपोर्ट अॅथोरेटिकडे सुध्दा माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक, अश्विनी सातपुते व गुन्हयाचे तपास अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील दोन टिम करुन मुंबई येथे त्याचेबाबत कसोशिने तपास करुन सदर आरोपी एअरपोर्ट कडे जाण्याचे तयारीत असताना, त्यास मिरा भाईंदर येथुन ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयात दोन आरोपी अटक करण्यात असुन, त्याबाबत तपास लक्ष्मण ढेंगळे करीत आहेत.
अशा प्रकारे माहे जानेवारी २०२४ मध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक-१ गुन्हे शाखेकडुन पुणे शहरात एकुण हडपसर, लष्कर, फरासखाना, बंडगार्डन हद्दीत कारवाई करुन एकुण ५ आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन २५ लाख २ हजारांचा १२१ ग्रॅम ७०० मिलीग्रॅम एम डी (मॅफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, (अति. कार्यभार), अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त, गुन्हे,अमोल झेंडे, सहा. पो. आयुक्त, गुन्हे-१, सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १, गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार, विशाल शिंदे, योगेश मोहिते, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, ज्ञानेश्वर घोरपडे, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदिप शिर्के, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, सचिन माळवे, रेहाना शेख, यांनी केली आहे.