पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
हवेली सिटी सर्व्हे कार्यालयाच्या अंतर्गत असेलेल्या खळकमाळ कार्यालयात कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर ६ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लक्ष्मी लावरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या मालमत्तेची वारस नोंद घेण्यासाठी हवेली सिटी सर्व्हे कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या खडकमाळ कार्यालयातील परिरक्षण भुमापक यांना भेटून कागदपत्रांची पुर्तता केली होती.
त्यानंतर कंत्राटी काम करणाऱ्या महिला कर्मचारी लक्ष्मी लावरे यांनी ती नोंद घेण्यासाठी त्यांच्यासाठी व परिरक्षण भुमापक यांच्यासाठी १० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
त्यामध्ये तक्रारदार यांच्या मालमत्तेच्या वारस नोंदीसाठी लक्ष्मी लावरे यांनी तडजोडीअंती त्यांच्या स्वतःसाठी व परिरक्षण भुमापक यांच्यासाठी ६ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे.