पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) अजहर खान
पुणे शहरातील वानवडी व कोंढवा पोलिस ठाण्याला वरिष्ठ पोलिस निरीक्षक नसल्याने अनेक वेळा चर्चा रंगली होती. तर त्याचा अतिरिक्त कार्यभार म्हणून पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. परंतु आज झालेल्या बदल्यांमध्ये वानवडी पोलिस ठाण्याला व कोंढवा पोलिस ठाण्याला अखेर वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिळाले आहेत.
कोंढवा पोलिस ठाण्याला वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून संतोष दगडू सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोनवणे यांनी यापूर्वी कोंढवा वाहतूक शाखेचा कारभार पाहिला होता. तर त्यांच्या कारभारवर कोंढवाकर खुश होते. त्यांनी वाहतूक नियोजनासाठी विषेश प्रयत्न देखील केले होते. तर आता कोंढवा पोलिस ठाण्याला वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून आल्याने कोंढवा मध्ये नक्कीच बदल होईल, वानवडी पोलिस ठाण्याला वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून भाऊसाहेब गोविंद पटारे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.