नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरवरून पाच लाख रुपये आण, असा तगादा लाऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी ५ जणांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरवरून पाच लाख रुपये आण,असा तगादा लाऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ सासरची मंडळी करित असल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. त्यावरून कोंढवा पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार ७ डिसेंबर २०२० ते जुलै २०२२ या कालावधीत कोंढवा येथील कौसरबाग आणि विमाननगर येथे घडला आहे. याबाबत पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी पती शोएब अशफाक शेख वय २५, सासरे अशफाक दादामिया शेख वय-५५ सासू शिरीन अशफाक शेख वय ४४,दीर अरबाज अशफाक शेख वय-२३ आणि अल्पवयीन नंणंद सर्व रा. कौसरबाग, कोंढवा यांच्या विरुद्ध आयपीसी ३७७, ४९८अ, ३२३,५०४, ५०६, ३५४अ, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यात सासरे अशफाक शेख यांना अटक झाली होती. सध्या ते जामीनावर बाहेर आले आहेत. मात्र, पोलिसांनी अद्याप मुख्य आरोपी पतीला अटक केलेली नाही.अॅड. मिथुन चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शोएब शेख हा खाजगी कंपनीत नोकरीला आहे.

फिर्यादी महिलेचे आरोपी शोएब शेख याच्यासोबत दुसरे लग्न झाले आहे. लग्नानंतर पती आणि सासरच्या मंडळींनी फिर्यादी यांना लग्नात हुंडा दिला नाही, मानपान केला नाही असे म्हणत शारिरीक व मानसिक त्रास दिला. तसेच फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरवरुन पाच लाख रुपये आण, असा तगादा लावला होता. माहेरवरुन पैसे आणले नाहीत तर तलाक देण्याची धमकी पतीने महिलेला दिली.

फिर्यादी महिलेने पतीकडून आणि असलेल्या त्रासाबद्दल सासरे अशफाक यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी महिलेसोबत गैरवर्तन करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला.पती आणि सासरच्या मंडळींकडून त्रास सहन होत नसल्याने महिलेने पतीसह सासरच्या मंड कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here