श्वानांची व मांजरांची नसबंदी शस्रक्रिया व लसीकरण करण्याच्या मोहिमे मध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल; पुणे महानगर पालिका.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे महानगरपालिका हद्दीतील भटक्या व मोकाट असणाऱ्या श्वानांची व मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्याची मोहीम पुणे महानगरपालिके कडून अनेक वर्षा पासून सुरु आहे. सदर मोहीम अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया (AWBI) यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेचे तंतोतंत पालन करून राबविण्यात येते.पुणे महानगरपालिका हद्दीतील भटक्या व मोकाट असणाऱ्या श्वानांची व मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने स्थायी समिती ठराव.क्र.२८. १६/४/ २० २० व स्थायी समिती ठराव क्र. १५९.२३/ ५/२०२२ अन्वये युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटी व Canine Control and Care Trust या दोन संस्थाची नेमणूक करण्यात आली आहे.

सदर संस्था पुणे महानगरपालिका हद्दीतील भटके व मोकाट श्वान व मांजर नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यासाठी पकडताना नागरीकांच्या कडून सदर संस्थेच्या गाड्या रस्त्यामध्ये अडविण्यात येतात व नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यासाठी पकडण्यात आलेले श्वान सोडण्यासाठी अथवा नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण झालेले श्वान व मांजर तेथेच सोडण्यात येऊ नये यासाठी कर्मचारी यांच्यावर दमदाटी करण्यात येते.

सदरील बाब (नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण झालेले श्वान व मांजर पुन्हा त्याच जागी सोडण्यात येऊ नये) अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया (AWBI) यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेचे उल्लघन करणारी आहे.सदरील बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्याच्या मोहिमे मध्ये बाधा निर्माण करणारी आहे.

तर पुणे मनपाने जाहीर प्रकटना द्वारे सर्व नागरिकांना कळविले आहे की, पुणे महानगरपालिकेच्या वतीने सदर काम करणाऱ्या दोन्ही संस्थाच्या कोणत्याही गाड्या रस्त्यामध्ये अडवून नसबंदी शस्रक्रिया व लसीकरण करण्याच्या मोहिमे मध्ये अडथळा निर्माण करू नये तसे केल्यास संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे डॉ. भगवान पवार आरोग्य अधिकारी पुणे महानगर पालिका यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here