लोणी काळभोर पोलीस ठाणे त्यांच्यावर कारवाई करत नसल्याने तक्रार दाखल.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत विविध ठिकाणी गांजा विक्री करणारे शेरखान पठाण, शोभा मॅडम, राजाभाई, मोहसीन पठाण,माउली आणि मटका अड्डे ४, जुगार अड्डे, वेश्याव्यवसाय कुंजीरवाडी येथे सर्व लॉजवर सुरु असून लोणी काळभोर पोलीस ठाणे प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.या अवैध व्यवसायिकांना लोणी काळभोर पोलीस पाठीशी घालत असून यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे.
यांच्याकडून लोणी काळभोर पोलीस हे नियमितपणे हप्ते वसूल करत असतात, तरी या सर्व अवैध धंदे मालकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सय्यद हबीब यासिन यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे.