वाहतूक महिला पोलीसाचा व्हिडिओ काढून फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी ९ जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहर वाहतूक महिला पोलीसाचा व्हिडिओ काढून फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ५००, ५०९,३४ सह माहीती व तंत्रज्ञान का.क. ६७ नुसार, ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशिला पवार, महिला पोलीस अंमलदार, शिवाजीनगर वाहतुक विभाग पुणे शहर यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी ह्या शिवाजीनगर वाहतुक विभाग या ठिकाणी कर्तव्य करीत असताना नमुद इसम याची दुचाकी नो-पार्किंगमध्ये पार्क केली असताना, त्यावर नो-पार्किंग प्रमाणे दंड मारुन सदरची दुचाकी ही फिर्यादी यांनी नमुद ठिकाणी घेवुन आणल्याचा राग मनात धरुन,नमुद ठिकाणी येवुन त्यांने त्याचे मोबाईल फोनद्वारे व्हिडिओ काढून फेसबुक लाईव्ह करून तो सोशल मिडीयावर व्हायरल केला,

व फिर्यादी यांना शिवीगाळ करुन नमुद इसमाबरोबर आलेल्या इतर साथीदार यांनी फिर्यादी यांना,अश्लिल भाषेत कमेंट करुन फिर्यादी यांची प्रतिमा मलीन करुन त्यांचे मनास लज्जा उत्पन्न करुन त्यांचे मानसिक खच्ची करण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here