अक्षर सुंदर नसल्याच्या कारणावरून वर्गशिक्षिकेने ६ वर्षांच्या मुलाला केली मारहाण
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यातील एका शाळेतील विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना घडली असून संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुल्क कारणाने मारहाण करून आणखीन मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. अक्षर सुंदर नसल्याच्या कारणावरून वर्गशिक्षिकेने ६ वर्षाच्या मुलाला मारहाण केली आहे.तसेच मारहाण केल्याचे घरी सांगितले तर आणखी मारेन,अशी धमकी मुलाला दिली.
मुलाने हा प्रकार वडिलांना सांगितल्यावर वडिलांनी वर्गशिक्षिकेविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लुल्लानगर येथील केंद्रीय विद्यालयात हा सर्व प्रकार घडला आहे.याप्रकरणी ३६ वर्षीय व्यक्तीने वानवडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
त्यानुसार ३५ वर्षीय शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा सहा वर्षांचा मुलगा लुल्लानगर येथील केंद्रीय महाविद्यालयात शिकण्यास आहे.फिर्यादी यांच्या मुलाचे अक्षर छान नसल्यामुळे संबंधित शिक्षिकेने त्याला हाताने मारहाण केली.
तसेच यानंतर जर मारहाण झाल्याचे घरी सांगितले तर तुला आणखी मारेन, अशी धमकी या शिक्षिकेने दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. वानवडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वानवडी पोलीस तपास करीत आहेत.