पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाच्या सहीचा वापर करून मीटर कॅलीब्रेशन प्रमाणपत्र विकल्याने येरवडा पोलिस ठाण्यात ५६९/२०२२ भादविक ४२०, ४६५, ४६८, ४७०,४७१,३४ प्रमाणे एजंटाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील फिर्याद तनुजा डोके सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, आळंदी रोड पुणे यांनी फिर्याद दिली असून त्या फिर्यादीवरून,
१) पराग रमेशचंद्र मोतीवाले वय ५१ वर्षे रा. ४७८ गुरवार पेठ पुणे, २) नजीर सुभान सय्यद वय ४३ वर्षे रा.पर्वती दर्शन नुराणी मस्जीद व इतर संबधिता विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सदरील प्रकार हा १ सप्टेंबर २०२२ रोजी ते ५ डिसेंबर २०२२ रोजी दरम्यान आळंदी रोड, फुलेनगर, पुणे आर.टी.ओ.ऑफीस,येथे घडला आहे. फिर्यादी ह्या वर नमुद ठिकाणी सहा मोटर वाहन निरीक्षक म्हणुन काम करीत असुन मोतीवाले व सय्यद व इतर संबंधीत इसमांनी अपापसात संगणमत करून फिर्यादी यांच्या नावाची बनावट सही करून बनावट शिक्के मारून तसेच प्रमाणपत्रावर बनावट अनुक्रमांक टाकून सदरचे मीटर कॅलीब्रेशन प्रमाणपत्र
संबंधीत ऑटोरिक्षा चालकांना प्रत्येकी ३०० रूपयांना देवून शासनाची फसवणूक केली आहे.