पुण्यातील साचापीर स्ट्रीटवर भिषण अपघात, ५ जण बिल्डिंगच्या स्लॅब वरून कोसळले एक जणाचा जागीच मृत्यू तर ४ जण गंभीर जखमी.

0
Spread the love

बिल्डर राणावत-मेहता व कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. 

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

पुण्यातील कॅम्प परिसरातील साचापीर स्ट्रीटवरील जुनं ओयसिस हॉटेल शेजारी, बिल्डिंग क्रमांक ४९५/४९६ या ठिकाणी सुरु असलेल्या बांधकामस्थळी मोठी दुर्घटना घडली असून, एका तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य चार कामगार गंभीर जखमी अवस्थेत आहेत.

ही दुर्घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर बिल्डर राणावत व मेहता, तसेच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे संबंधित अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी होत आहे.

स्थानिक नागरिक आणि कामगार हक्क कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.विशेष म्हणजे, याच जागेवर काही काळापूर्वीही एक कामगार मयत झाला होता, मात्र ती घटना दबवण्यात आली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

सदरील घटना ही दुपारी दोन अडीचच्या दरम्यान घडली असताना सदरील प्रकार दाबण्याचा प्रयत्न होत असल्याने नरेश पुष्पावती इंद्रसेन जाधव व कार्यकर्ते दिनेश परदेशी यांनी उघडकीस आणला.

घटनेची माहिती मिळताच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष अतिश कुऱ्हाडे व शाखा अध्यक्ष उमेश कांबळे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण माहिती पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे अधिकारी पाटील आणि साबळे यांना फोनवरून दिली.

बांधकाम सुरु करताना कोणतीही सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या प्रकरणी तात्काळ सखोल चौकशी करून जबाबदारांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here