वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोंढवाकरांचा एक पाऊल पुढे.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंढवा सांगितले तर अंगावर शहारे येतात ते का बरं? तर कोंढवा मध्ये वाहतूक कोंडी दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. त्यात दर रविवारी भररस्त्यात भरणारा ” संडे बाजार “ , ते बाजार बघता बघता मोठे बाजार बनले. परंतु त्याला आवरायला कोणीच तयार नव्हते?
रोज होणारी कोंडी त्यातून वारंवार येणाऱ्या बातम्या, त्यातून नाराजी पसरली होती. गेल्या काही दिवसांपासून रोजच या संडे बाजाराबाबतीत चर्चा कुठे ना कुठे ऐकायला मिळत होती.
}}}} 👉 पुणे ; कोंढव्यात वाहतूक कोंडी ने नागरिक बेहाल.! रस्त्यावर भरणाऱ्या “ संडे बाजार “ ने कोंडीच कोंडी. कोणाच्या आशिर्वादाने चालू बाजार ? बंद करण्याची मागणी. पहा व्हिडिओ.👇
तर पुणे सिटी टाईम्सने यावर वारंवार आवाज उचलत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.अखेर या कटकटीतून मार्ग काढण्यासाठी कोंढवाकर एकत्र येऊन निर्णय घेत रविवारीचे भरणारे संडे बाजार बंद करण्यात यशस्वी झाले आहेत. आता रस्ते, कचरा, आणि विषेश म्हणजे गटारीतून वाहनारे घाण पाणी यावर देखील एकत्र आले पाहिजे तरच आमचा कोंढवा साफ कोंढवा म्हणता येईल.




