पावसाळी अधिवेशन सुरू असताना उडाली खळबळ.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पावसाळी अधिवेशन सुरू असताना पुणे शहरातील एका रेशनिंग ऑफिसर ने दरमहा १० हजार रुपयांची दुकानदाराकडे मागणी केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मार्केटयार्ड मधील शारदा महिला बचत गटाने सदरील आरोप करीत कारवाईची मागणी केली आहे.
हकीकत अशी मार्केटयार्ड प्रेमनगर मध्ये शारदा महिला बचत गटाच्या नावाने रेशनिंग दुकान आहे. सदरील दुकान तपासण्यासाठी ह परिमंडळ अधिकारी तथा नायब तहसीलदार अमोल हाडे हे गेले होते. दुकान तपासणी झाल्यानंतर दुकानात धान्य बरोबर असतानाही, दरमहा १० हजार रुपये हफ्ता द्यावा लागेल असे हाडे यांनी सांगितले.
दुकानदाराने सांगितले की मी धान्याचा काळाबाजार करत नाही तर कशाला हफ्ता देऊ? तर हाडे म्हणाले सगळे देतात मग तुम्ही पण काळाबाजार करा आणि हफ्ता द्या? तेवढ्यात आसपासचे नागरिक जमा झाले आणि ते अमोल हाडे यांनाच प्रश्न विचारू लागल्याने हाडे यांनी पळ काढल्याचे रेशनिंग दुकानदाराने एका व्हिडिओद्वारे मुलाखतीत सांगितले आहे.
यापूर्वीही हाडे विरोधात अन्न धान्य वितरण कार्यालयात लेखी व तोंडी तक्रारी झाल्याचे सांगण्यात आले. परंतु त्यावर वरिष्ठांनी कोणतीच कारवाई केली नसल्याची माहिती मिळाली आहे. अशा हफ्तेखोर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित होते आहे. त्यात आता पावसाळी अधिवेशन सुरू असून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी काय कारवाई करतील याकडे लक्ष केंद्रित राहणार आहे. क्रमशः
शिधापत्रिका देण्यासाठी एक दीड हजारांचा भाव?
नागरिकांना दिली जाणारी शिधापत्रिकतून एजंट लूट करत असल्याने बऱ्याच तक्रारी झाल्या होत्या, अखेर शासनाने ऑनलाईन शिधापत्रिका काढली. परंतु ह परिमंडळ कार्यालयात कार्यकर्त्यांकडून शिधापत्रिका मंजुरीसाठी हजार दीड हजारांची मागणी केली जात असल्याचे नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगण्यात आले आहे.
रेशनिंग दुकानदाराने केलेल्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी.
रेशनिंग दुकानदाराने परिमंडळ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप लावल्याने सदरील प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याची व तो पर्यंत हाडे कडून चार्ज काढून घेण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागीय उपायुक्त पुरवठा यांच्याकडे अजहर खान यांनी तक्रार केली आहे.