नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची बकरी ईद संदर्भात बैठक पार पडली; बकरी ईदच्या दिवशी कुणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास थेट सहपोलिस आयुक्त संदिप कार्णिक यांना संपर्क करण्याचे मुस्लिम समजाला आव्हान

0
Spread the love

बकरी ईद संदर्भातील समस्या बाबतीत समाजाने मांडली व्यथा.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

२९ जून ते सलग तीन दिवस मुस्लिम समाजाद्वारे बकरी ईद साजरी केली जाणार असून पुणे शहर पोलिसांकडून मुस्लिम समाजाच्या बैठका घेऊन भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

या संदर्भात आज २१ जून रोजी अल्पबचत भवन येथे मुस्लिम समाजाची व पुणे शहर पोलिसांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरील कार्यक्रमाचे आयोजन माजी स्थायी समितीचे अध्यक्ष यांनी केले होते.

सदरील बैठकीत सह पोलिस आयुक्त संदिप कार्णिक व पोलिस उपायुक्त झोन २, व इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते. सदरील बैठकीत पोलिस सहआयुक्त कार्णिक यांनी बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम समाजाला येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या व समाजकंटकांकडून कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचाप्रयत्न केला गेला तर, थेट पोलिस सहआयुक्त संदिप कार्णिक यांना संपर्क साधण्याचे आव्हान कार्णिक यांनी केले आहे.

सदरील बैठकीत माजी स्थायी समितीचे अध्यक्ष रशिद शेख, मोहन जोशी, अरविंद शिंदे, अयुब शेख, सिदार्थ धेंडे, माजी नगरसेवक रफिक शेख, हसीना इनामदार, नुरूद्दीन अली सोमजी, संगिता तिवारी, मेहबूब नदाफ, हाजी फिरोज शेख, माजी नगरसेवक रईस सुंडके, वाजिद एस खान, खिसाल जाफरी, जुबेर मेमन, मुनव्वर कुरेशी,समिर शेख,युसुफ शेख,ईकबाल शेख,राहुल डंबाळे उपस्थित होते.

बकरी ईदचा सन दिवस असून सदरील तीनही दिवशी बोकड, म्हैस कापल्या जातात. परंतु ते कापल्या नंतर बोकडाचे मास आहे का? म्हशीचे हे क्वचित लोकच जाणून शकतातः परंतु काही समाजकंटक याचा गैर फायदा घेऊन पोलिसांवर दबाव आणून चुकिच्या पध्दतीने गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले जाते. तसे न करता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून अहवाल आल्यानंतरच गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी समाजिक कार्यकर्ते अजहर अहमद खान यांनी पोलिस सहआयुक्त संदिप कार्णिक यांच्याकडे केली. बैठकीत समाजिक कार्यकर्ते व राजकीय कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here