पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
पुणे शहरात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्या इसमा विरोधात कायदेशीर कारवाई करणे बाबत वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने युनिट २ प्रभारी अधिकारी क्रांतीकुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे व पोलिस अमलदार कादिर शेख, समीर पटेल,शंकर नेवसे, उत्तम तारू यांना वरिष्ठांच्या आदेशाने कायदेशीर कारवाई बाबत आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने अर्जदार प्रदीप दिगंबर दड्डीकर रा. थिटे वस्ती रेसर कंपनी मागे खराडी पुणे यांच्याकडून १०% व्याजाने ७ लाख ७५ हजार रुपयेच्या बदल्यात २८ लाख रुपये बेकायदेशीर वसुली करणाऱ्या सावकार १) दुर्गेश कुमार पांडे वय ३३ वर्ष रा. डी ३०१ रॉयल हेरिटेज रोड सातव नगर व त्याचा साथीदार २) जेडी और पसागर धोत्रे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
त्याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २६/२०२३ भा.द.वी.क ५०४,५०६,३४ सावकारी अधिनियम सन २०१४ चे कलम ३९,४५ अन्वये गुन्हा दाखल करून विमानतळ पोलिस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास विमानतळ पोलिस करीत आहे. सदरील कामगिरी पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील गुन्हे शाखा युनिट २,नितीन कांबळे पोलीस अंमलदार शंकर नेवसे,कादिर शेख समीर पाटील व उत्तम तारू यांचे पथकाने केली आहे.