पुण्यातील खळबळजनक घटना; महिलेला जिंवत जाळण्याचा प्रकार

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी

पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या आलेख वाढत आहे. एकाने बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी चक्क एका महिलेवर रॉकेल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

रमजान खालील पटेल राहणार. म्हाडा वसाहत भीमनगर मुंढवा असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर मुंढवाकरण्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी पिडीनेते फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार रमजान पटेल हा फिर्यादीचा ओळखीचा आहे. त्याने २०१८ मध्ये पीडित फिर्यादीला फिरायला जाऊ असे सांगून तिला बाहेर नेले. यावेळी त्याने फिर्यादिशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडितेने आरोपी रमजान विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पांगरी येथे तक्रार दिली होती.

या प्रकरणी सोलापूर न्यायलात केस सुरू आहे. दरम्यान, आरोपी हा काही दिवसांपूर्वी फिर्यादी ज्या ठिकाणी राहतात त्या इमारतीत काही दिवसांपूर्वी कुटूंबासह राहण्यास आला.त्याच्यावरील बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी रमजानने तिला धमकावण्यास सुरुवात केली. बुधवारी तिला रमजानने राहत्या बिल्डिंग खाली शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून पीडिता ही सुदैवाने बचवली.दरम्यान, तिने पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दिली.त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा फरार
असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here