त्या पोलिसाने तरूणाला स्वताच्या टाटा नेस्कॉन कारमधून ससून हॉस्पिटलानेत भविष्य खराब करण्याची दिली धमकी?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
काही महिन्यांपूर्वी बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्याने अख्या महाराष्ट्र खळबळ उडाली होती. तर पोलिस यंत्रणेवर आरोप देखील झाले होते. त्या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी घाटात पोलीस मदत केंद्र सुरु करण्यात आले होते. तेथे नेमलेला पोलिस अंमलदार भलतेच उद्योग करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेमलेले पोलीसच फिरायला आलेल्या तरुणांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन लुटत होता.
बोपदेव घाटात तिघा तरुणांना धमकावुन २८ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी त्या महाभागाला निलंबित केले आहे.
पोलीस अंमलदार विक्रम लक्ष्मण वडतीले आणि त्याचा मित्र केदार जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत चेन्नई येथील एका १९ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ५ जून रोजी सकाळी सात ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान बोपदेव घाटात घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी विक्रम वडतीले याला रात्रीपाळीची ड्युटी देण्यात आली होती.
फिर्यादी हे आपल्या पुण्यातील दोन नातेवाईकांबरोबर बोपदेव घाटात फिरायला आले होते. विक्रम वडतीले याने या ५ जून रोजी सकाळी ड्युटीवर असताना या तरुणांना धमकावून त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडील बॅगेत हुक्का पॉट सापडला.
यावरुन वडीतले त्यांना मारहाण करुन येथे बसून हुक्का ओढल्याची धमकी दिली. त्यानंतर त्या तिघांना स्वतःच्या टाटा नेक्सॉन चारचाकी गाडीत बसून पोलीस ठाण्याच्या मेनगेटवर आणले. तेथून त्यांना ससून रुग्णालयात तो घेऊन गेला.
तेथे त्यांचे भविष्य खराब करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी २५ हजारांची मागणी केली. त्यांच्याकडे इतकी रक्कम नसल्याने किमान प्रत्येकी १० हजार रुपये देण्याची मागणी केली. तडजोडीअंती त्याने मित्र केदार जाधव याच्या गुगल पे अकाऊंटवर २८ हजार रुपये ऑनलाइन घेतल्याचे समोर आले आहे. अधिक तपास कोंढवा पोलिस करित आहेत.