सय्यदनगर अंडरपास येथे एकाची ड्युटी मग दोनजण अतिरिक्त कारवाईसाठी जास्त का?
पोलिस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली.
तोंडाला रूमाल तर शर्टाचे बाह्य मोडलेले. खडक वाहतूक पोलिसांसारखी काळेपडळ वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात जाहिरपणे सांगितले होते की, लपवून छपून कारवाई करण्यात येऊ नये परंतु पोलिस अधिकारी, कर्मचारी पोलिस आयुक्तांचे आदेशाचे पालन करतीलच हे कशावरून?
पोलिस आयुक्तांनी बोलवून दाखवले असले तरी आज काळेपडळ वाहतूक पोलिसांनी केराची टोपली दाखत आम्हाला आयुक्तांच्या आदेशाशी काहीही देणेघेणे नाही असे दाखवून दिले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ८ जून २०२५ रोजी काळेपडळ वाहतूक विभागाने सय्यदनगर रेल्वे गेट येथे पोलिस शिपाई ८५६६ जाधव यांची सकाळी ८ ते २२ वाजेपर्यंत ड्युटी नेमून दिली होती. तर सय्यदनगर अंडरपास येथे पोलिस हवालदार ११७५ साळुंखे यांची नेमणूक होती. परंतु हे दोघे ही दिवसभर सदरील ठिकाणी कामावर नसल्याचे पुणे सिटी टाईम्सच्या पाहणीत दिसून आले,
तर सायंकाळी ५ वाजता हे दोन्ही महाशय प्रकट होऊन सय्यदनगर अंडरपास येथे कारवाई करताना दिसून आले. तसेच त्यात आणखी एक वाहतूक पोलिस त्यांच्या सोबत कारवाईत मग्न असल्याचे दिसून आले. सदरील ठिकाणी फक्त एकच म्हणजे ११७५ सांळूखे यांची नेमणूक असताना हे दोन कर्मचारी तेथे का आले? वरिष्ठांनी त्यांना कारवाईचे आदेश दिले होते का?परंतु का?तसेच कारवाई करताना तोंडाला रुमाल बांधून कारवाई का? लोकांनी तक्रार करू नये म्हणून का?
ड्युटीवर असताना डोक्यावर टोपी, आणि शिस्तबद्ध पोलिस कर्मचारी असले पाहिजे. परंतु सदरील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टोपी नाही? शर्टाचे बटन उघडे, शर्टाचे बाह्य वरती? दिसून आले. आणि विषेश म्हणजे तो तीसरा कर्मचारी कोण? त्याची नेमणूक कुठे होती? मग हे त्रिकूट एकत्र मिळून कारवाई का करत होते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे?
काही दिवसांपूर्वी खडक वाहतूक पोलीस नेमणूक केलेल्या ड्युटीच्या ठिकाणी न थांबता पूरम चौक येथे थांबून कारवाई करत असताना आढळून आल्याने पोलिस उपायुक्त ( HQ) अतिरिक्त कार्यभार वाहतूक शाखा भाजीभाकरे यांनी खडक वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली होती. तशी कारवाई या वसुली बहाद्दरांवर होणार का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी विचारला आहे. आता यावर वरिष्ठ काय कारवाई करणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे. क्रमशः