पुण्यातील समाजिक कार्यकर्त्याने पुणे महानगर पालिका आरोग्य विभागडे केली अजबच मागणी; अधिकारीही चक्रावले

0
Spread the love

माझ्या नावाचा नाम फलक स्व. राजीव गांधी हॉस्पिटल मध्ये लावण्यास मिळावी परवानगी

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) अजहर खान

पुण्यातील पुणेकर कधी काय काय विषय घेऊन मागणी करतील याचा काय भरवशा नाय? मागणी काही असो ती रास्त असली की अधिका-यांना ती मान्यच करावी लागते, पुण्यातील येरवडा भागात राहणाऱ्या एका समाजिक कार्यकर्त्याने पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडे अजब मागणी केल्याने अजब मागणीची गजबची चर्चा पुणे महानगर पालिकेत सुरू आहे.

येणाऱ्या आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला माझा प्रचार करण्यासाठी माझ्या नावाचा नाम फलक लावुन लोकांसमोर मीही निवडणूकीच्या शर्यतीत सहभागी आहे हे दाखवून देण्यासाठी येरवडा येथील स्व.राजीव गांधी हॉस्पिटलच्या दार्शनीक भागामध्ये माझ्या नावाचा नाम फलक लावुन घ्यायचा आहे.

त्यासाठी आपण मला रितसर परवानगी द्यावी अशी मागणी येरवड्यातील समाजिक कार्यकर्ते एजाज खान यांनी केल्याने सर्वत्र ठिकाणी त्या पत्राची चर्चा सुरू आहे. आता पुणे महानगर पालिका मागणी मान्य करणार का? याकडे उत्सुकता लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here