गुन्हे दाखल होऊनही राजरोसपणे बेकायदेशीरपणे रूफटॉप हॉटेल सुरुच.
सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांचे हॉटेलांवर हातोडा कधी?
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
कोंढवा येथील लूलानगर चौकातील बेकायदेशीरपणे चालत असलेल्या रूफटॉप “द व्हेजिटा” रेस्टॉरंटला आग लागल्यानंतर खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर पुणे सिटी टाईम्सने पुण्यातील रूफटॉप हॉटेलवर कारवाई होणार का? या सदराखाली बातमी प्रसिद्ध केली होती. पुणे महानगर पालिकेची झोपी गेलेली यंत्रणा जागी झाली व तात्पुरते का होईना कारवाईचा फास आवडला, आणि विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे रूफटॉप हॉटेलांवर कारवाईचा बडगा उगारला असून ७ रूफटॉप हॉटेलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

फारूख पटेल इमारत निरिक्षक बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक ४ यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.१) द माफिया स्काय लॉज, सर्वे नं. २३० लुंकड स्काय विस्टा, विमाननगर, पुणे (सुमारे १५ मिटर बाय १८ मिटर लांबीचे (क्षेत्रफळ २७० चौ. मि.) २) चेसर डेक रेस्टरंन्ट सर्व नं. १९९ पैकी साई अपेक्स मॉल, पुणे (सुमारे १० मिटर बाय १५ मिटर लांबीचे (क्षेत्रफळ १५० चौ. मि.) ३) हॉटेल हिंदुस्तान इंटरनशनल,वडगाव शेरी, सर्वे नं. ३३, पुणे, (सुमारे २० मिटर बाय २० मिटर लांबीचे (क्षेत्रफळ ४०० चौ. मि.) ४) अॅम्बीयंन्स हॉटेल, सर्वे नं. १९९/२०० पैकी रॉयल टवर, श्रीकृष्ण चौक, विमाननगर, पुणे.(सुमारे १० मिटर बाय १५ मिटर लांबीचे (क्षेत्रफळ १५० चौ. मि.) ५) शामीयाना रेस्टॉरन्ट, प्लट नं. ३३, सम्राट अशोक रोड, विमाननगर,

(सुमारे १० मिटर बाय १५ मिटर लांबीचे (क्षेत्रफळ १५० चौ. मि.) ६) रूड लॉज अॅण्ड बार आणि टेस्ट ऑफ पंजाब सर्वे नं. ३३ पैकी वडगाव शेरी, ट्रेडनेट बिल्डींग, नगर रोड, पुणे. (सुमारे ८ मिटर बाय १० मिटर लांबीचे (क्षेत्रफळ ८० चौ. मि.), ७) अँटमस्पीअर ६ सर्वे नं. १९९ स्कायमक्स मॉल, दत्तमंदिर चौक,विमाननगर, पुणे, (सुमारे २० मिटर बाय २० मिटर लांबीचे (क्षेत्रफळ ४०० चौ. मि.) या सर्वानी टेरेसवर कच्च्या पत्राचे बांधकाम करून अनाधिकृत हॉटेलचा व्यवसाय सुरू केला असल्याने पुणे महानगर पालीकेतर्फे

संबंधीत मिळकत धारकांना महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम
१९६६ चे कलम ५३(१) (अ), ५४ अन्वये वेळो वेळी नोटीस अदा करण्यात आली होती. परंतु या सर्वांनी तसेच बेकायदेशीरपणे रूफटॉप हॉटेल चालू ठेवल्याने हॉटेल धारकांविरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम चे कलम ४३ सह कलम ५२ अन्वये गुन्हा केला आहे. पुढील तपास एम.एस. पाठक सहायक पोलीस निरीक्षक करीत आहे. अशी माहिती आज पुणे महानगर पालिकेतील अधिकृत सुत्रांनी पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधींना दिली आहे.