पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पुण्यातील येरवडा भागात दोन जणांचा सपासप वार करून खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.केलेल्या फायरींगचा बदला घेण्यासाठी ८ ते १० जणांच्या टोळ्याने दोघांवर सपासप वार करुन त्यांचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष ऊर्फ किसन राठोड अशी खून झालेल्यांची नावे आहेत. ही घटना येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील पांडु लमाण वस्तीतील श्वेता चव्हाण यांच्या कार्यालयाबाहेर पहाटे ३ वाजता घडली. याप्रकरणी सुभाष राठोड यांचा भाऊ लक्ष्मण राठोड याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माहितीनुसार, सुभाष राठोड याने २००८ च्या दरम्यान शंकर चव्हाण यांच्यावर फायरिंग केले होते. त्या गुन्ह्यात
शिक्षा भोगून राठोड बाहेर आला होता.
अनिल वाल्हेकर, सुभाष राठोड व आणखी एक जण पहाटेच्या सुमारास
मोटारसायकलवरुन जात होते.त्यावेळी ८ ते १० जणांच्या टोळक्याने त्यांना वाटेत अडविले.त्यांच्यावर सपासप वार करुन त्यांचा निर्घृण खून केला. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार हा पळून गेला.ही घटना समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पहाटे घटनास्थळीपोहचले.त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन गुन्हा दाखल केला असून येरवडा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.