कार मध्ये पोलिसांच्या नावाची पाटी लावून फिरत होते. त्यातूनच निघाली हत्यारे?
कोंढवा कौसरबाग मध्ये रात्री २ वाजेपर्यंत हॉटेल सुरू असल्याने नागरिकांनी व्यक्त केली नाराजी.
१२ नंतर सर्व दुकाने बंद करण्याची स्थानिक नागरिकांची पोलिस आयुक्तांकडे मागणी.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
रमजानचा महिना सुरू असल्याने कोंढव्यात दिवसरात्र लगबग पाहायला मिळते, तर रात्री जेवणासाठी बाहेरून लोकं देखील येत असतात, रात्री लोकांची गर्दी जास्त होत असल्याने तेथील नियोजन कमी पडते. वाहतूक कोंडी, रस्त्यावर वाहने पार्क करणे व इतर कारणाने रोज किरकोळ भांडणे देखील होत असतात. परंतु तेथेच जाग्यावर ते वाद मिटले देखील जातात.
परंतु काल रात्री १९ मार्च २०२५ रोजी एक कार चालक हॉटेल चालकाशी वाद घालत असल्याने तेथे जमाव जमला होता त्यातीलच काही तरूण तेथे पाहत थांबले होते. ते पाहत थांबले असल्याने कारचालकाला राग आला आणि त्याने काय बघतोय म्हणत हुज्जत घालून थेट कारमधून तलवारीने तरूणावर हल्ला चढवला. त्यात तरूण गंभीर जखमी झाला आहे.
हकीकत अशी की, आफाक आशपाक शेख, वय ३० वर्षे, धंदा व्यवसाय, रा. फ्लॅट नं १०, भाग्यलक्ष्मी टॉवर, मिठानगर, कोढवा खुर्द,१९ मार्च २०२५ रोजी रात्री कौसरबाग मस्जिद येथील तराबीह नमाज संपल्यावर नाश्ता घेण्यासाठी मित्र अजिज शेख याचेसह बन मस्का कौसरबाग रोड, येथे आलो होतो.
*कोंढवा कौसरबाग मध्ये गाडीच्या पार्किंगच्या वादातून तलवारीने हल्ला, पोलीसाच्या नावाची पाटी लावून कार बिनधास्तपणे फिरत होती. कारमध्ये हत्यारे असल्याची प्राथमिक माहिती.🔗👇*
*INSTAGRAM LINKS 🔗👇*
तेथे त्यांचा चुलत भाऊ आसिफ यूसुफ शेख वय २९ वर्षे. हा भेटण्यासाठी आला होता. अफाक हे ११.३० वा सुमारास गौसिया हॉटेल, सना हॉस्पीटल जवळ, येथे आले असता तेथे पांढऱ्या रंगाची फोक्स वॅगन जेटा MH.43. AE 5999 ह्या कारमधील गणेश राखपसरे (लंगडा) व त्याचा एक साथीदार हा गौसिया हॉटेल मालका बरोबर वाद घालत होता.
त्यावेळी ते तेथे थांबलेले होते. तेव्हा गणेश लंगडा मला म्हणाला की, तु क्या देखता है, तेव्हा मी त्यास तु झगडे करेगा तो मैं देखूंगा ना असे म्हणालो. तेव्हा त्याने मला थांब तुला दाखवितो कारमधून माझा मोबाईल घे रे असे म्हणून तो कार जवळ गेला. तेथे लोकांची खूप गर्दी होती. त्या गर्दीतून त्याने त्याचे कारमधून कोणते तरी धारदार हत्यार हातात घेवून आला.
व गर्दीतून येवून त्याने आफाक यास जीवे मारण्याचे हेतूने त्याचे हातातील धारदार हत्याराने डोक्यावर डावे बाजूस जोरात मारले. व खांद्यांवर व डाव्या हातावर जोरात मारून जखमी करून शिवीगाळ करत त्याचे हातातील हत्यार गर्दीत आजूबाजूला फिरवून दहशत माजवून लोकांची पळापळ केली. आफाक जखमी झाल्याने त्यांचा मित्र अजिज व चुलत भाऊ आसिफ शेख यांनी उपचारा साठी सना हॉस्पीटल येथे नेले व तेथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मला ससून हॉस्पीटलला नेले.तर आफाक यांचा चुलत भाऊ आसिफ हा भांडणे सोडवताना त्यालाही भांडणामध्ये मार लागले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ जखमींना उपचारासाठी नेले होते.
” गणेश राखपसरे हा कारमध्ये पोलिस पाटी लावून फिरत होता. “
गणेश सोबत त्याचे कुटुंबातील महिला देखील होत्या, तर गणेश तेथे जेवायला आल्याचे बोलले जाते आहे. परिवाराला जेवायला घेऊन येताना त्याने गाडीत हत्यारे देखील घेऊन आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. कारमध्ये पोलिस पाटी लावून गणेश राखपसरे हा बिनदिक्कतपणे हत्यारे घेऊन फिरत असताना, कोणाच्याही कधी लक्षात आले नाही? तर त्या कारमध्ये एकापेक्षा जास्त हत्यारे असल्याचे प्रथमदर्शी पाहणाऱ्यांनी सांगितले आहे.
” आम्ही वैतागलोय.. पोलिसांनी एकदाचाच बाजार बंद करावा. “
या रोजच्या कटकटीने आम्ही वैतागलोय, कौसरबाग मध्ये खायला येणारे लोक पिऊन देखील आलेले असतात आणि दारुच्या बाटल्या कुठे फेकून देतात. तर या उशिरा चालणाऱ्या बाजारामुळे आम्हाला याचा रोजचाच त्रास सोसावा लागत असल्याने पोलिसांनी सदरील बाजार, हॉटेल १२ वाजता बंद करण्यात यावे. अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.