मनपा बांधकाम विभाग झोन ५ च्या अधिकाऱ्यांवर वरदहस्त कोणाची?
माजी नगरसेविकेच्या पती समोर अधिकाऱ्यांचे लोटांगण?
बेकायदेशीरपणे पत्र्याचे शेड उभारत असताना व बांधकाम पूर्ण होईपर्यंत पालिका अधिकारी झोपले होते का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभारावर नागरिकांनी उघडकीस आणून दिला आहे. आपल्या सोई प्रमाणे काम करणारे अधिकारी आपण पाहिले असतील? यात शंकाच नाही? कोंढवामध्ये बेकायदेशीरपणे बांधकामांना नोटीसा दिल्यावर दोन दिवसांत कारवाई केली जाते हे कोंढवाकरांना चांगलेच ठाऊक आहेत.
परंतु कौसरबाग हद्दीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम वेगळेच आहे. म्हणजे २४ तासांची नोटीस देऊन टाकायची आणि आपणच मिस्टर इंडिया सारखे गायब व्हायचे? अशी अवस्था आज पालिकेच्या अधिकाऱ्यांची झाली आहे.
कौसरबाग सोसायटीने बेकायदेशीरपणे पत्र्याचे शेड उभारून दुकाने भाडयाने देण्याचा प्रकार केल्याने सोसायटीच्या लोकांनीच याला विरोध केला आहे. कौसरबाग सोसायटीने गेल्या काही दिवसांपूर्वी अचानकपणे भिंती आड पत्र्याचे शेड उभारण्याचे काम सुरू केले. आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर भिंत तोडून टाकली.
व मस्त रंगरंगोटी करून पत्र्याचे शेड भाडयाने देण्यात आले. याची तक्रार काहींनी मनपाकडे केल्यानंतर, अधिकाऱ्यांनी अधिकार पदाचा वाव आणत कौसरबाग सोसायटीच्या नावाने २१ जानेवारी २०२५ रोजी नोटीस बजावली आणि त्यात विषेश नमूद होते की, २४ तासांत बेकायदेशीरपणे पत्र्याचे शेड काढून टाकण्यात यावे अन्यथा पालिकेच्या वतीने काढून टाकण्यात येईल आणि येणारा खर्चा आपल्याकडून वसुल करण्यात येईल.
परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस देऊन आज दोन महिने होत आले तरी कारवाईसाठी अधिकारी फिरकले देखील नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोटीस बजावण्यात आल्यानंतर माजी नगरसेविकेच्या पतीने पालिका गाठून अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली व त्यानंतर विषय आपापसात मिटवले? माजी नगरसेविकेच्या पतीचे असे हस्तक्षेप व बेकायदेशीर बांधकामांना अभय देणे योग्य वाटते का?
याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बाबतीत कनिष्ठ अभियंता विजय पाटील, उप अभियंता विजय दाभाडे यांना मेसेज करून कारवाई बाबतीत विचारणा केली असता दोघांनी उत्तर दिलं नाही. याचाच अर्थ मी मारल्या सारखं करतो तू रडल्यासारखं कर? पालिकेने दोन दिवसात कारवाई करावी अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. तर उपनिबंधक कार्यालयाकडून सोसायटीच्या कारभाराबाबत पुणे सिटी टाईम्स माहिती घेत आहे.