सय्यदनगर मध्ये घरासमोर आयपीएल मॅच बघत बसलेल्या युवकावर धारधार शस्त्राने वार करून जीवघेणा हल्ला; वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

हडपसर सय्यदनगर मध्ये घरासमोर आयपीएल मॅच बघत बसलेल्या युवकावर धारधार शस्त्राने वार करून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.वानवडी पोलिस ठाण्यात १८६/२०२३, भादविक ३२४,३२३,३३६,५०४,५०६, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेंडमेन्ट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शादाब सैय्यद, वय-१९ वर्षे, रा. गुलामअली नगर, सय्यदनगर,हडपसर, यांनी फिर्याद दिली आहे.

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गल्ली नं. १५/ए,सय्यदनगर, याचे घरासमोर यातील फिर्यादी हे त्यांचा मित्र फैजान याचेकडे जावुन त्याचे घरासमोर गप्पा मारत व आय.पी.एल.मॅच पाहत बसले असताना, त्याठिकाणी मोटार सायकल वरून आलेल्या चार इसमांनी त्यांचेकडील लोखंडी धारदार शस्त्राने जुन्या भांडणाचे कारणावरुन फिर्यादी यांचे डोक्यात वार करुन त्यांना जखमी केले,

सदर ठिकाणी पडलेली फरशी उचलुन ती फिर्यादीचे डोक्यात मारत असताना त्यांनी हाताने धरून,त्यांचा जीव वाचविण्याचे उद्देशाने गल्लीतुन पळुन जात असताना, सदर इसमांनी नमुद ठिकाणी पडलेले दगड,विटा फेकुन मारुन फिर्यादी व इतर नागरीकांचे जीवतीची व त्यांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणली आहे.पुढील तपास जयवंत जाधव करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here