बुधवार पेठेत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई;१८ जणांवर गुन्हे दाखल

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुण्यातील बुधवार पेठेत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा घालून १८ जणांवर कारवाई केली असून एकुण ६७ हजार २८० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १७ एप्रिल रोजी क्रांती चौक,बुधवारपेठ पुणे परीसरात काही इसम बेकायदेशीरपणे सोरट जुगार खेळत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.

सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीरपणे सोरट जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने १८ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण ६८हजार २८०रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेल्या १८ इसमांविरूध्द फरासखाना पोलीस ठाण्यात गुरनं.६१/ २०२३, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता फरासखाना पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच अश्विनी पाटील,अनिकेत पोटे,पोलीस अंमलदार,राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे,अजय राणे,मनिषा पुकाळे, इरफान पठाण,इम्रान नदाफ,हणमंत कांबळे,संदीप कोळगे,अमित जमदाडे या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here