हडपसर पोलीस परिसरात चोरुन जुगार खेळणारे १३ इसमांवर कारवाई,

0
Spread the love

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगार खेळणाऱ्या १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ९ नोव्हेंबर रोजी अरविंद गोकुळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली इसम किरण जगताप हा रामोशी आळी हडपसर,

येथे बंद खोलीमध्ये जुगार खेळत आहेत. त्याप्रमाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळे यांनी कारवाई करणेकरीता सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर व स्टाफ तयार करुन त्यांना कारवाई करणेबाबत मार्गदर्शन व सुचना देऊन रवाना केले.

बातमीचे ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्यांना सदर ठिकाणी जुगार चालु असल्याची खात्री झाल्याने त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकुन त्या ठिकाणी वरील मुद्देमाल व जुगार खेळणा-या इसमांना ताब्यात घेतले आहे.

१) किरण मारुती जगताप, वय ४० वर्षे रा.रामोशी आळी, हडपसर,
२) पोपट वसंत जगताप वय ४६ वर्षे, रा.केडगाव, ता.दौंड, जि.पुणे, ३) गणेश शिवकंड माने वय ३१ वर्षे रा.काळेपडळ, हडपसर,४) अजिंक्य देवीदास शिंदे वय ३० वर्षे रा. ससाणेआळी, हडपसर,५) चंदन जितेंद्र सिंग वय २० रा.रामोशी आळी, हडपसर,६) सत्यवान व्यापारी चव्हाण वय ४२ वर्षे रा. साडेसतरा नळी, हडपसर,७) विक्रम संजय खोमणे, वय ३४ वर्षे रा. काळेपडळ, हउपसर,८) दिपक हिरालाल ढावरे वय ३० वर्षे रा. चिंतामणीनगर, हडपसर,

९) रोहन चंद्रकांत मोडक, वय २५ वर्षे रा. वडकीनाला, ता.हवेली जि.पुणे १०) औंदुबंर चंद्रकांत देवळे वय ४८ वर्षे रा. मांजरी बुाा,११)एक इसम वय ६८ वर्षे रा. लॅन्ड मार्क सोसायटी, उंड्री, पुणे १२)श्री सत्यदेव जाधव वय २८ वर्षे रा. डीपी रोड, हडपसर,१३)अलताब युसुफ मदार वय ४८ वर्षे रा. सय्यदनगर, हउपसर, असे मिळून मुद्देमाल रोख रक्कम ५९ हजार रुपये, ९ मोबईल फोन,३ मोटार सायकल तसेच जुगाराचे साहीत्य असा एकुण १ लाख ५५ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.


सदरची कारवाई नम्रता पाटील,पोलीस उप आयुक्त, कल्याणराव विधाते,सहा पोलीस आयुक्त,हडपसर, अरविंद गोकुळे,वरीष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे,दिंगबर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), हडपसर मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे,पोलीस अंमलदार,सागर दळवी,राहुल मद्देल व इतर स्टाफ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here