पुणे महानगर पालिकाआरोग्य प्रमुख व उप आरोग्य प्रमुख यांच्या १० वर्षांपासून रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी सर्वसाधारण सभेने केलेला ठराव सहा महिने दाबून ठेवल्याचा आरोप

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे महापालिकेत आरोग्य प्रमुख व उप आरोग्य प्रमुख यांच्या १० वर्षांपासून जागा रिक्त आहेत.शासनाच्या आरोग्य विभागाकडून उधार उसनवार अधिकारी आणणे किंवा त्या अधिकार्यांना तात्पुरता कार्यभार देणे असं गेली १० वर्षे सुरु आहे.

याचं मूळ कारण म्हणजे या पदांसाठी निश्चित केलेली अवास्तव शैक्षणिक अर्हता.पुणे महापालिका सर्वसाधारण सभेने याचा आढावा घेऊन १० मार्च २०२२ रोजी या शैक्षणिक अर्हतांमध्ये बदल करण्याचा ठराव केला व तो तातडीने शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यास पुणे महानगर पालिका आयुक्तांना सांगितले.मात्र गेले सहा महिने आयुक्तांनी हा ठराव शासनाकडे मंजुरीसाठी न पाठवता दाबून ठेवला आहे.

शासनाकडून उसनवारीने आणलेल्या आरोग्यप्रमुखांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर २०२२ रोजी संपुष्टात आला आहे. कोरोना महामारी सारख्या अभूतपूर्व संकटातून गेल्यानंतरही आरोग्य या विषयाला इतके दुय्यम स्थान असावे हे पुणेकरांचे दुर्दैवच आहे.

पुणेकरांची अनेक वर्षे अस्तित्वात असलेली मिळकत करातील ४०% सवलत रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात दाखवलेला उत्साह हा ठराव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवताना का लोप पावला हे अनाकलनीय असल्याचे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

” आता तरी हा ठराव तातडीनं शासनाकडे मंजुरीसाठी पाठवून व त्याचा पाठपुरावा करून आरोग्य प्रमुख व उप आरोग्य प्रमुख या महत्वाच्या पदांच्या भरतीसाठी प्रयत्न सुरु करावेत ” विवेक वेलणकर अध्यक्ष सजग नागरिक मंच पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here