कोंढव्यातून ८ लाख ७१ हजारांचा गुटखा जप्त;अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

कोंढव्यातून ८ लाख ७१ हजारांचा गुटखा अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून जप्त करण्यात आला आहे.अंमली पदार्थ विरोधी पथक – २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे परिमंडळ – ५ मधील कोंढवा पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, येवलेवाडी ते खडी मशिन चौक दरम्यान सिराज नुरआलम मनसुरी हा सिल्व्हर रंगाचा टेम्पो क्रमांक एम.एच. १२/टी/व्ही./७६१६ यामधुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा याची पोती विक्री करीता घेऊन जाणार आहे.

मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथक-२, कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी परीसरात सापळा लावला असता, दांडेकरनगर सिंहगड कॉलेज जवळ येवलेवाडी कोंढवा,येथे सिराज नुरआलम मनसुरी, वय-२९ वर्षे,रा.स.न. ४२, नुर मश्जिद जवळ कोंढवा, पुणे हा येत असताना, त्यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातील टेम्पोची झडती घेतली असता, टेम्पो मध्ये ४ लाख २३ हजार ३६० रुपये किंमतीचा तंबाखुजन्य पान मसाला, गुटखा व ५ लाखांचा टेम्पो जप्त करण्यात आला.


त्याचेकडे तपासा दरम्यान चौकशी करुन त्याने बोपगाव, ता. पुरंदर येथे असलेले गोडाऊन मध्ये अणखीन माल ठेवला असलेबाबत सांगीतल्याने, सदर गोडाऊन येथे छापा कारवाई करुन ४ लाख ४८ हजार ६०० रुपये किंमतीचा पान मसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे.


आरोपीकडुन एकुण १३ लाख ८१ हजार ९६० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याचे विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. १०३१/ २०२२, ३२८,१८८, २७२,२७३, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने ( जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय),अधिनियम कलम ७ (२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६ चे कलम २६ ( २ ) (i)(iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करून, सदरचा तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा जप्त केला आहे.

दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक दिगंबर चव्हाण हे करीत आहेत. सदरील कामगिरी पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण,एस. डी. नरके, पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रोकडे,मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, शेख, शेळके, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, शेख, युवराज कांबळे,दिनेश बास्टेवाड व महिला पोलीस अंमलदार, दिशा खेवलकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here