खडकमाळ येथील कुणाल पोळ खून प्रकरणातील २१ आरोपींची निर्दोष मुक्तता,

0
Spread the love

शंकरशेठ रोडवरील सम्राट हॉटेल मध्ये झाला होता खून.

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी

एकेकाळी सख्ख्या भावासारखे राहणारे मित्रच वर्चस्वाच्या कारणावरून एकमेकांचे वैरी झाल्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होते. पूर्ववैमनस्यातून खडकमाळ येथील कुणाल पोळ याचा शंकरशेठ रोडवरील सम्राट हॉटेल मध्ये गोळ्या घालून,धारदार शस्त्राने हल्ला कुणाल पोळ याला जीवे मारले होते.


तसेच फिर्यादी व हॉटेल मालक याच्यावर गोळ्या झाडून आरोपी पसार
झाले,असा आरोप असलेल्या २१आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी.रागीट यांनी हा निकाल दिला आहे.

न्यायालयात हा खटला तब्बल आठ वर्षे चालला .जंगल्या विशाल श्याम सातपुते,मंगेश श्याम सातपुते, अमित नारायण घाडगे, तुषार श्याम तपुते, रिजवान सय्यद,सागर मोहन शिंदे, हरिशा नरसिंगराव कोंडाळ,

किरण दशरथ थोरात,आकाश रमेश भुतेकर, सचिनहनुमंत देवगिरीकर, सिद्धार्थ राम लोखंडे,सुभाष बाबू गडडम, अक्षय विजय घुले, शंकर तिप्पना कोळी, कृष्णा रणपिसे, सोन्या खंडागळे, भूषण सुनील, लडकत आकाश राजेंद्र सपकाळ, रोहन लक्ष्मण चव्हाण,गणेश शंकर पवार दत्ता अर्जुन चव्हाण यांची न्यायालयाने मुक्तता केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here